Shirdi News गोविंद साळुंके
महाराष्ट्र

सात महिन्यात 64 लाख भाविकांनी घेतले साई दर्शन,188 कोटींचे दान प्राप्त

मंदिर खुले झाल्यानंतर सात महिन्यातच 64 लाख भाविकांनी शिर्डीला येवून साईबाबा समाधीचे दर्शन घेतल्याचे देखील सांगितले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मोबीन खान

शिर्डी - दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर साई मंदिर ऑक्टोबर 2021 मध्ये खुले झाले. त्यानंतर अवघ्या सात महिन्यात साईंच्या झोळीत तब्बल 188 कोटींपेक्षा जास्त विक्रमी दान जमा झाले आहे. शिर्डी (Shirdi) साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी ही अधिकृत आकडेवारी दिली आहे. त्याचबरोबर मंदिर खुले झाल्यानंतर सात महिन्यातच 64 लाख भाविकांनी शिर्डीला येवून साईबाबा समाधीचे दर्शन घेतल्याचे देखील सांगितले आहे.

हे देखील पाहा -

साईबाबांच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक शिर्डीत येतात. अशा परिस्थितीत भाविक बाबांच्या दरबारात रुपये-पैसे, सोने -चांदी आणि इतर अनेक मौल्यवान वस्तूंचे दान करतात. कोरोना महामारीनंतर साईमंदिर सुरू झाल्यापासून गेल्या सात महिन्यांत साई भक्तांनी बाबांच्या झोळीत भरभरून दान दिले असून ऑक्टोबर 2021 ते मे 2022 या सात महिन्यांत एकूण 188 कोटी 55 लाख रुपये साईंच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

कोविड काळात लॉकडाऊन मुळे शिर्डीचे अर्थचक्र पूर्णतः थांबले होते परंतु कोविड काळानंतर साई मंदीर सुरू झाल्याने देश भरातील साई भक्त शिर्डीत येत असल्याने शिर्डीचे अर्थ चक्र पुन्हा सुरळीत झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महिला ग्रामविकास अधिकाऱ्यावर दगडफेक; सरकारी कामात अडथळा आणणारा आरोपी अटकेत

Lanja Fort : इतिहासातील महत्त्वाचे ठिकाण, 'लांजा'जवळ लपलाय 'हा' भव्य किल्ला, एकदा नक्की पाहा

BJP Rajesh Sawant : कोकणातील भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षाचं निधन, राजकारणावर शोककळा

वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये इडली, डोसा आणि मेदूवडा खाऊ शकतो का? जाणून घ्या

Blood Pressure : हाय अन् लो बीपीच्या रुग्णांनी किती प्रमाणात मीठ खावे? हेल्थ एक्सपर्टचा 'हा' सल्ला दुर्लक्षित करू नका

SCROLL FOR NEXT