साईभक्तांसाठी खुशखबर... आजपासून मिळणार साईबाबांच मुखदर्शन
साईभक्तांसाठी खुशखबर... आजपासून मिळणार साईबाबांच मुखदर्शन SaamTV
महाराष्ट्र

साईभक्तांसाठी खुशखबर... आजपासून मिळणार साईबाबांच मुखदर्शन

गोविंद साळुंके, साम टीव्ही, शिर्डी

शिर्डी : कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साई भक्तांना आनंदाची बातमी आहे साईबाबांच्या (Saibaba) दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आजपासून मूखदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. आरतीच्या व्यतिरिक्त मूख दर्शन भाविकांना घेता येणार आहे कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत 7 ऑक्टोबरला साई समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

हे देखील पहा -

15 हजार भाविकांना ऑनलाइन पास (Online Pass) द्वारे साई मंदिरात प्रवेश दिला जातोय तर भाविकांच्या मागणीनुसार 10 हजार ऑफलाइन पास भाविकांना दिले जातात त्यामुळे दिवसभरात 25 हजार भाविक साईबाबांच्या दर्शनाचा लाभ घेत आहे.

गर्दीच्या काळामध्ये अनेक भाविकांना दर्शनाचा लाभ मिळत नसल्याने भाविकांच्या मागणीनुसार आजपासून मुख दर्शन सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आजपासून मूख दर्शन घेता येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत यांनी दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : राहुल गांधींच्या सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनाच नो एन्ट्री

Amit Shah : अमित शाह यांच्या Deepfake व्हिडिओ प्रकरणी दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; ट्विटर हॅण्डल चालवणाऱ्या एकाला अटक

Contractors Engineer: राज्यातील अभियंता कंत्राटदार ७ मे पासून करणार काम बंद

Sanjay Nirupam Joins Shinde Group | संजय निरूपम यांचा शिंदे गटात प्रवेश

Pravin Darekar On Amol Kolhe | अमोल कोल्हेंबाबत मोठा गौप्यस्फोट!

SCROLL FOR NEXT