sagarwadi vadner gangai villagers andolan for regular water supply at mgp office in daryapur Saam Digital
महाराष्ट्र

Amravati : उपविभागीय अभियंता गेले काेठे? वडनेर गंगाई, सागरवाडी ग्रामस्थ आक्रमक, दर्यापूर जीवन प्राधिकरण कार्यालयात छेडलं आंदाेलन

Amravati Water Crisis : गावात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने अनेकदा नागरिकांनी अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही दखल घेत जात नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली.

Siddharth Latkar

- अमर घटारे

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपविभागीय अभियंता यांच्या खुर्चीला संतप्त ग्रामस्थांनी फुलाचा हार व टेबल वर मेणबत्ती लावून एमजीपीच्या कारभाराचा निषेध नाेंदविला. दरम्यान कारभारात याेग्य सुधारणा न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदाेलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. (Maharashtra News)

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात बहुतांश गावात पाण्याचा ठणठणाट आहे. पूरेसे पाणी असूनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कारभारामुळे पाणी मिळत नसल्याचे बहुतांश गावातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

अनियमित व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई व सागरवाडी येथील ग्रामस्थ आज (साेमवार) आक्रमक झाल्याचे पाहवयास मिळाली. सकाळी दहा वाजल्या पासून अधिकारी कार्यालयात गैरहजर राहिल्याने संतप्त ग्रामस्थांनी एमजीपीच्या कारभाराचा निषेध नाेंदविला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ग्रामस्थांनी उपविभागीय अभियंता यांच्या खुर्चीला फुलाचा हार घातला व टेबल वर मेणबत्ती लावून अधिका-यांच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. गावात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने अनेकदा नागरिकांनी अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही दखल घेत जात नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badshah Divorce : बॉलीवूडमध्ये पुन्हा खळबळ! 'या' प्रसिद्ध रॅपरने घेतला ५ महिन्यातच घटस्फोट; ईशा रिखीसोबत नाते संपले

Maharashtra News Live Update: मनविसे च्या 2 कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांकडून अटक

Gold Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर बदलले, वाचा तुमच्या शहरातील 24k, 22k, 18k चे लेटेस्ट रेट्स

अमित ठाकरेंवरील गुन्ह्यानंतर पोलिसांची मोठी कारवाई! मध्यरात्री २ नेत्यांना ठोकल्या बेड्या, राजकारणात खळबळ

Operation Tiger: मोठी बातमी! नवरात्रीआधी ठाकरेंचे १४ आमदार फुटणार, शिंदेसेनेत प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT