sadabhau khot & sharad pawar saam tv
महाराष्ट्र

Politics: 'जाईल तिथं काड्या लावणा-या पवार साहेबांचे आडनाव 'आगलावे' ठेवावं'

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खाेत हे आज साेलापूर जिल्हा दाै-यावर आले आहेत.

विश्वभूषण लिमये

साेलापूर (sadabhau khot criticises sharad pawar) : शरद पवार हे महान नेते आहेत. त्यांनी या राज्यामध्ये काड्या करण्यापलीकडे काही केले नाही. जाईल तिथं आग लावायची एवढेच त्यांचे राज्यात काम आहे. त्यांचे आयुष्य आग लावण्यामध्येच गेलं आहे. त्यामुळे त्यांचे पवार हे आडनाव बदलून 'आगलावे' असे करावे अशी टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्यावर साेलापूरात (solapur) केली. (sharad pawar latest marathi news)

सदाभाऊ खोत हे साेलापूर दाै-यावर आज (साेमवार) आले आहेत. साम टीव्हीशी बाेलताना त्यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करीत महाविकास आघाडी सरकारचा कारभार शेतक-यांच्या मुळावर आल्याचे म्हटलं.

दरम्यान सांगलीतील (sangli) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यासंबंधी बोलताना सदभाऊंनी पवारांवर तोफ डागली. ते म्हणाले जाईल तिथे पवार साहेब काड्या लावण्याचे काम करीत असतात. खरं तर ते महान नेते आहेत. मात्र एकीकडे आग लावल्यानंतर पुन्हा दुसऱ्याच्या (ठिकाणी) घराला आग लावायला निघून जायचं. त्यांचे आयुष्यच आग लावण्यामध्येच गेलं. त्यामुळे पवार हे आडनाव बदलून 'आगलावे' असे करावं.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT