Sadabhau Khot Saam Tv
महाराष्ट्र

मी पुन्हा येईन! हे खरं करुन दाखवू, ते ही ब्रह्मदेवास चुकवून; खाेतांचा पवारांना टाेमणा

सदाभाऊ खाेत यांनी महाराष्ट्र सरकारावर आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली.

विजय पाटील

सांगली : बारामतीचा (Baramati) गडी एवढा हुशार कसा. शरद पवार (sharad pawar) यांच्यामध्ये नक्की कोणते स्पेअर पार्ट टाकले आहेत हे मी वर गेल्या-गेल्या ब्रह्मदेवाला विचारणार आहे असा खोचक टोला सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी शरद पवार यांना लगावला आहे. ते सांगली (sangli) जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते. दरम्यान मी पुन्हा येईन हे वाक्य आपल्याला खरं करायचं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचे आहे असे आवाहन खोत यांनी उपस्थितांना केले. (sadabhau khot latest marathi news)

खाेत म्हणाले नुकतीच ब्राह्मण समाजाने शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पवारांनी ट्वीट करून दुसऱ्यांच्या आरक्षणाला तुम्हांला विरोध करता येणार नाही असं ब्राह्मण समाजाला सांगितले मात्र आम्ही असे म्हटलंच नाही हे ब्राह्मण समाज आता ओरडून सांगत आहे. त्यामुळे बारामतीचा गडी कसा आला, हे आपण मेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार आहोत. मला वाटतं की हा गडी ब्रह्मदेवाला चुकवून खाली पळाला असेल. इतका बिलंदर माणूस राजकारणात कधीही मिळणार नाही असा टोमणा खाेत यांनी पवारांना लगावला.

मी पुन्हा येईन!

मी पुन्हा येईन, हे वाक्य आपल्याला खरं करायचं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचं आहे. हे लोक त्यांच्या वाक्याची खिल्ली उडवतात. मात्र शेतकऱ्यांचा दुष्काळ हटवण्यासाठी, त्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्यासाठी आणि बारा बलुतेदारांना न्याय देण्यासाठी, मी पुन्हा येईन, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसवायचे आहे असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टाेला

गोपीचंद आणि सदाभाऊच्या नादाला कश्याला लागतंय. तुम्हांला बांबू लावल्या शिवाय सोडत नाही. आम्ही पहिलंच नंग आहे. तुम्हाला चौकात नंग केल्याशिवाय राहणार नाही असेही खोत म्हणाले. हे राज्य जनतेसाठी नाही हे राज्य जनतेला लुटायसाठी चालवले जात आहे. या मुख्यमंत्र्यांना काही कळत नाही. हे सरकार आंधळं, बहिरे, लुंगळ आहे. या सरकारला सामान्य माणसाचे काही देणेघेणे नाही. इतर राज्यात पेट्रोल स्वस्त आहे आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी दोन रुपयांनी स्वस्त केले. म्हणजे सव्वा लाखाची मूठ याची दोन रुपयाची झाली. दोन रुपयाचे पान पट्टीवर पान पण मिळत नाही. महाराष्ट्र मधील जनतेची थट्टा तुम्ही करत आहात असा टाेला खाेत यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना लगावला.

वेडी लाेक क्रांती घडवतात

काय काय गडी म्हणत्यात गोपीचंदच्या बराेबर कसा. मी पहिला पागल होतो आणि दुसरं पागल मिळालं आणि आमचं जमलं. पागलाची दोस्ती होती आणि क्रांती कोण करते शहाणी माणसं क्रांती करत नाहीत पागल माणस क्रांती करतात. आणि आम्ही ती करुन दाखविणार. आम्ही देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करणार असेही खोत यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंचा पाटलांना मोठा धक्का! TDCC निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय, मोठा उलटफेर

सौदी अरबमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू

Pune Rainfall: पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं, ढगफुटीसदृश्य परिस्थिती; जनजीवन विस्कळीत, पाहा VIDEO

Moong Dal Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ चिल्ला, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कार आणि चाकू SIT कडून जप्त

SCROLL FOR NEXT