Sadabhau Khot Saam Tv
महाराष्ट्र

राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून येणार - सदाभाऊ खोत

सरकारने केतकी चितळे सारखं आमचं हाल केलं; सदाभाऊ खोत यांची टीका

भारत नागणे

पंढपूर - एक पोस्ट व्हायरल केली म्हणून केतकी चितळे (Ketaki Chitale) वर राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत, तिच्या सारखचं आमचं‌ पण हाल या सरकारने केलं आहे अशी मिस्किल टीका सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांनी केली.

देवेंद्र तुम्ही राज्यात पुन्हा येणार आहात. त्यावेळी मात्र बारामतीच्या गड्यांना आत घेवू नका असे आवाहन ही त्यांनी केले. अलीकडेच शरद‌ पवार यांनी मी पुन्हा येणार या वरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती तोच धागा पकडून खोत म्हणाले की,होय राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री म्हणून येणार आहेत. यावर आमचा ठाम विश्वास आहे. पण आम्हाला आता वेगळे देवेंद्र फडणवीस बघायचे आहे.

हे देखील पाहा -

पुढे ते म्हणाले की, उजनीतून बारामतीला एक थेंब ही पाणी जावू देणार नाही असा इशारा देखील सदभाऊ खोत यांनी यावेळी दिला. पालक मंत्र्यांनी‌ "कंस मामा"ची भूमिका घेवून नये अन्यथा श्रीकृष्ण रूपी देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने कंस मामाला आम्ही गाडल्या शिवाय राहणार नाही असा इशारा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

माढा तालुक्यातील टेंभूर्णी येथे जागर शेतकऱ्यांचा, आक्रोष महाराष्ट्राचा या यात्रेचा समारोप रात्री विरोधी‌पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी सदाभाऊ खोत यांनी उजनीच्या पाण्यासाठी आपण संघर्ष उभा करणार असल्याचे सांगत शरद पवार यांच्यावरही टिका केली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT