श्री देव घोडेमुखचा जत्रोत्सव; 35 हजार कोंबड्यांचा बळी Saam Tv
महाराष्ट्र

श्री देव घोडेमुखचा जत्रोत्सव; 35 हजार कोंबड्यांचा बळी

यावर्षी जत्रोत्सवात हजारो भाविकांनी गर्दी केली

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड- पेंडुर येथील श्री देव घोडेमुखचा वार्षिक जत्रोत्सव आज भक्तिमय वातावरणात, सालाबात धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला आहे. मागील दोन वर्षे कोरोनामुळे (Corona) जत्रोत्सव गाव (Village) मर्यादित होता. मात्र, यावर्षी जत्रोत्सवात हजारो भाविकांनी (devotees) गर्दी केली होती. नवसाच्या 30 ते 35 हजार कोंबड्याचे (hens) बळी दिले आहेत. (sacrifice of 35 thousand hens)

हे देखील पहा-

भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या ३६० चाळ्यांचा अधिपती सरसेनापती श्री घोडेमुखचा वार्षिक उत्सव संपन्न झाला. देवाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून भाविकांनी गर्दी केली होती. दर्शनासाठी सिंधुदुर्ग (Sindhudurg), गोवा, कर्नाटक, मुंबई, कोल्हापूर (Kolhapur) आदी भागातून भाविकांनी डोंगर चढून देवाचे दर्शन घेतले. मातोंड सातेरी मंदिर येथून तरंग देवतांचे सुमारे १० किलोमीटर पायपीट करून, घोडेमुख मंदिर येथे आगमन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या जत्रोत्सवाला सुरुवात झाली.

यानंतर देवस्वाऱ्या डोंगर चढून घोडेमुख मंदिरात (temple) पोचल्यानंतर सालाबात धार्मिक विधिना सुरुवात झाली. गावकरी, मानकरी यांच्यामार्फत घोडेमुखच्या चाळ्यांंना नारळ, कोंब्याचा मान देण्यात आला. यानंतर ग्रामस्थ भाविक यांच्यामार्फत हजारो कोंबयाचा मान येथील चाळ्यांना देण्यात आला. दरम्यान सायंकाळी देवस्वाऱ्या अवसारी परत सातेरी मंदिराकडे निघाल्यानंतर या जत्रोत्सवाची सांगता झाली.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar News : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एक पाऊल पुढे, भाजप-शिवसेनेच्या आधी जाहीर केला उमेदवार

Maharashtra Live News Update: खगोलशास्त्रातील आणखी एक तारा हरपला

Maharashtra winter : महाराष्ट्राचा पारा घसरला, गुलाबी थंडी कधी येणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो

Spiritual benefits: कार्तिक मासातील पवित्र एकादशी; आरोग्य, कामकाज आणि नात्यांवर कसा होईल प्रभाव?

Todyas Horoscope: 'या' राशींना नवीन संधी आणि वाटा सहज उपलब्ध होतील, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT