Akola News Saam Tv
महाराष्ट्र

Saam Impact : अकोल्यातील 'स्कायमेट वेदर स्टेशन' घोटाळा प्रकरणी सरकार अ‍ॅक्शन मोडवर, काय कारवाई होणार?

Akola News : अकोल्यात स्कायमेट वेदर स्टेशनच्या चुकीच्या अहवालामुळे २ हजारांवर शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित राहिले. साम टीव्हीने या घटनेची बातमी लावून धरल्याने कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांनी या प्रकरणाची दखल घेत तातडीची बैठक बोलावली आहे.

Alisha Khedekar

  • स्कायमेट वेदर स्टेशनच्या चुकीमुळे २ हजार शेतकरी मदतीपासून वंचित राहिले.

  • पाणी मापक यंत्र नाल्यात बसवल्याने पावसाची नोंद चुकीची झाली होती.

  • या घटनेची बातमी साम टीव्हीने लावून धरल्याने सरकार अलर्ट मोडवर आहे.

  • या प्रकरणी कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांनी ७ ऑक्टोबरला बैठक बोलावली आहे.

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

अकोल्यात 'स्कायमेट वेदर स्टेशन'चा चुकीच्या अहवालामूळ २ हजारांवर शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. या प्रकरणी साम टीव्हीने बातमी लावून धरली होती. याचा परिणाम म्हणून सरकारने ठोस पाऊल उचलत ७ ऑक्टोबर रोजी बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

उमरा मंडळात 'स्कायमेट कंपनीने 'वेदर स्टेशन' अर्थात पाणी मापक यंत्र चुकीच्या ठिकाणी बसवल्यामुळे अतिवृष्टी आणि पावसाची नोंद घेण्यास असमर्थ ठरलं होत. हे पाणी मापक यंत्र नाल्यात बसवल्यानं मोठा गोंधळ झाला आणि २००० पेक्षा अधिक शेतकरी सरकारच्या मदतीपासून वंचित राहिले.

दरम्यान, १७ सप्टेंबरला उमरा परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने सर्वत्र नुकसान झाले. तसेच गेल्या २ वर्षापासून असलेल्या स्कायमेट वेदर स्टेशनचा चुकीचा अहवाल जात असल्याने या २००० शेतकऱ्यांना फटका बसला होता. हे पाणी मापक यंत्र एका नाल्याच्या पात्रात स्थित असल्याने यंत्राच्या रिंगेजवरून पाणी वाहत होते. त्यामुळे हे यंत्र पावसाच्या पावसाची नोंद घेण्यात तांत्रिकदृष्ट्या असमर्थ ठरले, असे तपासाअंतिम निष्पन्न झाले.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष होता. त्यानंतर आता कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांनी दाखल घेतली असून मंगळवारी अर्थातच ७ ऑक्टोबर रोजी मुंबईत बैठक बोलावली आहे. दुपारी अडीच वाजता ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या उमरा मंडळातील बाधित शेतकरी उपस्थित असणार आहे. दरम्यान या बैठकीत काय निर्णय घेण्यात येतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: गुहागरच्या बुधल बीचवर चिपळूणच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT