Pankaja Munde News : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज म्हणजेच सोमवारी महाराष्ट्रात येणार आहेत. त्यामुळे जे.पी. नड्डा यांच्या चंद्रपूर आणि औरंगाबाद दौऱ्याकडे अख्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान जे.पी. नड्डा यांच्या या कार्यक्रमपासून भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा रंगली होती.
कारण, जे.पी नड्डा यांच्या औरंगाबादेतील कार्यक्रमाच्या बॅनर्समधून पंकजा मुंडे यांचा फोटो डावलण्यात आला. याशिवाय जे.पी. नड्डा यांच्या या कार्यक्रमपासून पंकजा मुंडे यांना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. कारण कार्यक्रमासाठी छापण्यात आलेल्या बॅनर्सवर पंकजा मुंडे यांचा फोटो नव्हता.दरम्यान, साम टीव्हीने याबाबत बातमी दाखवताच, सर्व बॅनर्सवर पंकजा मुंडे यांचा फोटो लागला. परंतु, पंकजा मुंडे यांना अद्याप जे.पी. नड्डा यांच्या कार्यक्रमाचे निमंत्रणच मिळालेले नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांचे समर्थक नाराज होण्याची शक्यता आहे.
जे.पी. नड्डा यांची पाच वाजता जाहीर सभा
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून लोकसभेसाठी तयारी सुरू झालीय. त्यासाठी आज सायंकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची सभा होणार आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणाऱ्या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष व्हा चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, राष्ट्रीय सरचिटणीस, पंकजा मुंडे यांच्यासह मराठवाड्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
त्यांच्या या सभेसाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. याच सभेतून नड्डा हे लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुकणार असल्याचं सुद्धा बोलले जात आहे. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर नड्डा यांचा हा औरंगाबादचा पहिला दौरा आहे. त्यामुळे आज जे पी नड्डा काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.