साम इम्पॅक्ट: बीड शहरातील मुख्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात... विनोद जिरे
महाराष्ट्र

साम इम्पॅक्ट: बीड शहरातील मुख्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात...

साम टीव्हीच्या बातमीच्या दणक्याने बीड शहरातील मुख्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे.

विनोद जिरे

बीड: साम टीव्हीच्या बातमीच्या दणक्याने, बीडच्या बांधकाम विभागासह IRB कंपनीला जाग आली आहे. त्यांनी बीड शहरातील मुख्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केलीय. साम टिव्हीने बीड शहरातील मुख्य महामार्गाचं कसं निधन झालं? हे दाखवलं होतं. (Saam Impact: The pits on the main highway in Beed city are being filled)

हे देखील पहा -

शहरातील या खड्ड्यांचे स्पॉट पंचनामे करत रस्त्यांचं भेसूर वास्तव समोर आणलं होतं. याच बातमीची दखल आता संबंधित विभागाने घेतली असून आता शहरातील मुख्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान जे खड्डे बुजवण्यात येत आहेत, ते निकृष्ट दर्जाचे बुजवले जात असून दहा ते पंधरा दिवसांनी पुन्हा या महामार्गावर खड्डे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तर या विषयी बीडमधील स्थानिक नागरिक विश्वनाथ पाटोदेकर म्हणाले, की साम टीव्हीने वेळोवेळी रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्याची बातमी दाखवली आहे. आता कुठेतरी काम सुरू झालं आहे. मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं सुरू असून यामुळे पुन्हा खड्डे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणखीन पावसाळा संपला नाही, त्यामुळे प्रशासनाने थातुरमातुर काम करण्यापेक्षा, चांगले खड्डे बुजवावीत. ज्याने करून बीडकरांना पुन्हा या खड्ड्यांचा त्रास होणार नाही, अशी मागणी विश्वनाथ पाटोदेकर यांनी केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात भरधाव कार ८० फूट दरीत कोसळली

IPL 2026: आयपीएलपूर्वीच KKR ला 440 वोल्टचा झटका; मॅचविनर गोलंदाज IPL 2026 मधून OUT, कोणाची होणार एन्ट्री?

Induction Use: गॅस सोडून इंडक्शन वापरताय? तर या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात

Chanakya Niti : 'अशा' लोकांना घरात पाऊलही ठेवू देऊ नका, अन्यथा सुखाचा होईल कचरा

Mumbai : मुंबईतील सरकारी हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT