सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ जोरदार चर्चेत होता. या मतदारसंघात राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवार गटाकडून शरद पवार गटात उडी मारली होती. त्यामुळे ही लढाई प्रतिष्ठेची झाली होती. राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात शिंदे गटाचा उमेदवार रिंगणात होता. सकाळ समूहाच्या एक्झिट पोलनुसार, राजेंद्र शिंगणे हे जिंकण्याची शक्यता आहे.
सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून राजेंद्र शिंगणे रिंगणात उतरले होते. तर शिंदे गटाने शंशिकांत खेडेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. या मतदारसंघातील प्रमुख लढतीत राजेंद्र शिंगणे यांचा वरचष्मा पाहायला मिळत आहे. त्यामुळे सलग दुसऱ्यांना राजेंद्र शिंगणे यांना लोकांकडून पसंती मिळत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या पुतणीनेही त्यांना आव्हान दिलं होतं.
बुलढाण्यात मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघात शिंदे गटाकडून शशिकांत खेडेकर आणि अजित पवार गटाचे मनोज कायंदे रिंगणात होते. त्यांच्या विरोधात राजेंद्र शिंगणे रिंगणात होते.
दुसरीकडे राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात त्यांची पुतणी गायत्री शिंगणे देखील रिंगणात होत्या. या मतदारसंघात मतदानाचा टक्केवारी वाढलेली पाहायला मिळाली. त्यामुळे राजेंद्र शिंगणे हे विजयी होऊ शकतात. मतदारसंघातील मतविभाजनामुळे राजेंद्र शिंगणे यांना होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.