Ghansawangi Assembly constituency, rajesh tope vs hikmat udhan saam tv
महाराष्ट्र

Saam Exit Poll : घनसावंगीत घमासान; राजेश टोपे बाजी मारणार का? एक्झिट पोलचा अंदाज काय?

Maharashtra Exit Poll : घनसावंगीत पंचरंगी लढत रंगली. पण मुख्य लढत ही राजेश टोपे आणि हिकमत उढाण यांच्यात होती. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार या मतदारसंघात कोण बाजी मारू शकतो याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पाहा संपूर्ण व्हिडिओ.

Nandkumar Joshi

अक्षय शिंदे, साम टीव्ही

घनसावंगी मतदारसंघात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात लढत रंगली. या मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे यांचे पारडे जड असल्याचे एक्झिट पोलमधून सांगण्यात येत आहे. संभाव्य आमदार कोण होणार? राजेश टोपे की हिकमत उढाण? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बऱ्याच ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात लढत बघायला मिळाली. घनसावंगी मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेश टोपे आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हिकमत उढाण यांच्यात सरळ लढत होती.

आता मतदान घेण्यात आलं आहे. मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिला, कुणाला नाकारलं, हे २३ तारखेला निकालातून स्पष्ट होईलच. तत्पूर्वी सामच्या मतदानोत्तर चाचणीत संभाव्य आमदार म्हणून राजेश टोपेंना मतदारांनी कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

राजेश टोपे हे बाजी मारणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. घनसावंगी मतदारसंघात पंचरंगी लढत रंगली. राजेश टोपे, हिकमत उढाण, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कावेरी खटके, भाजपचे बंडखोर सतीश घाटगे, ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार शिवाजीराव चोथे या पाच उमेदवारांमध्ये लढत होती. पण मुख्य लढत ही राजेश टोपे आणि हिकमत उढाण यांच्यात रंगली. आता प्रत्यक्ष निकालात कुणाच्या पारड्यात मतांचं दान टाकलं जातं, कोण बाजी मारतं, हे पाहावं लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

Pune Traffic Diversions News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतुकीत आज मोठा बदल; पर्यायी मार्ग कोणते?

Ahilyanagar : जातीची बंधने झुगारत अंध शिवाजी आणि आशाने बांधली लग्नगाठ; सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून अनोखा रिसेप्शन सोहळा

Nilesh Sable: 'डॉक्टर ते ॲक्टर' निलेश साबळेविषयी या गोष्टी कोणालाच माहित नाही

Beed: सामाजिक कार्यकर्त्याचा प्रताप; जिल्हा परिषदेच्या कार्यालयात गेला, महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करत...

SCROLL FOR NEXT