Maharashtra Exit Polls  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की भाजप, शिराळा विधानसभेत कोणाचं पारडं जड? पाहा एक्झिट पोल

Saam exit polls, shirala assembly constituency : शिराळा विधानसभा मतदारसंघात शरद पवार गट विरुद्ध भाजप अशी लढाई झाली. या लढाईत शरद पवार गटाची सरशी पाहायला मिळत आहे.

Vishal Gangurde

सांगलीतील शिराळा विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चुरशीची लढत झाली. या मतदारसंघात कोणाची जादू चालणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. सकाळ समूहाच्या एक्झिट पोलनुसार, या मतदारसंघात शरद पवार गटाचं पारड जड असल्याचं बोललं जात आहे. या एक्झिट पोलने भाजपचे टेन्शन वाढवलं आहे.

शिराळा विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून मानसिंग नाईक रिंगणात उतरले होते. तर भाजपकडून सत्यजीत देशमुख रिंगणात उतरले होते. या दोन प्रमुख उमेदवारांमध्येच प्रमुख लढत दिसून आली. या मतदारसंघात मानसिंग नाईक यांच्या शरद पवारांनी सभा घेतली होती. त्याचा फायदा शिराळ्यात मानसिंग नाईक यांना झाल्याचं पाहायला मिळत आहे.

काय आहेत मतदारसंघातील समीकरण?

शिराळा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या बालेकिल्ल्यात मानसिंग नाईक हे अनेक वर्षांपासून निवडून येतात. त्यांनी अनेक विकासकामे केली आहे. त्यांच्या अनेक संस्था आहेत. अनेक निधी त्यांनी तालुक्यात आणला आहे. त्यांच्या विरोधात भाजपने सत्यजीत देशमुख यांना उमेदवारी दिली होती.

या मतदारसंघातून महाडिक गटाकडून उमेदवारी मागण्यात आली होती. मात्र, त्यांना डावललं गेलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून महाडिक गटाला पाठिंबा देण्यास सांगितलं. त्यामुळे सत्यजीत देशमुख यांचंही पारडं जड आहे. मात्र, मतदारसंघातील विकासकामे पाहता, मानसिंग नाईक विजयी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी...

Strong Bones : हाडांना कमजोर करतात हे 7 अन्नपदार्थ; तज्ज्ञांनी दिला इशारा

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT