jalna vidhan sabha arjun khotkar vs Kailas Gorantyal saam tv
महाराष्ट्र

SAAM Exit Poll : जालन्याचा संभाव्य आमदार कोण? अर्जुन खोतकर की कैलास गोरंट्याल? पाहा व्हिडिओ

Maharashtra Exit Poll results : जालना विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत आहे. मतदान झालं आहे. आता अर्जुन खोतकर की कैलास गोरंट्याल बाजी मारणार, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.

Nandkumar Joshi

अक्षय शिंदे, साम टीव्ही

जालना मतदारसंघात शिंदे गटाचं वर्चस्व पाहायला मिळतंय. या मतदारसंघात संभाव्य आमदार म्हणून अर्जुन खोतकर यांच्याकडे पाहिलं जात आहे. काँग्रेसने कैलास गोरंट्याल यांना रिंगणात उतरवलं होतं. शिंदेंची शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होती. त्यात गोरंट्याल हे बाजी मारू शकतात, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे.

जालना विधानसभा मतदारसंघात खोतकर विरुद्ध गोरंट्याल यांच्यात चुरस पाहायला मिळाली. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या बंडखोरांमुळं काट्याची टक्कर झाल्याचे चित्र दिसून आले.

महाविकास आघाडीचे बंडखोर आणि महायुतीचे बंडखोर उमेदवार यांच्यामुळं झालेल्या मतविभाजनाचा फटका दोन्ही उमेदवारांना बसलेला दिसतो. काँग्रेसचे बंडखोर अब्दुल हाफिज यांच्या अपक्ष उमेदवारीमुळं काँग्रेसचे उमेदवार गोरंट्याल यांना अधिकचा फटका बसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर हे या मतदारसंघातून विजयी होतील, असा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त केला जात आहे.

या वेळची विधानसभा निवडणूक ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच रंगली. राज्यातील अनेक मतदारसंघात दोन्ही आघाडी आणि महायुतीचे उमेदवार यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली. प्रचारही तसाच रंगला होता. दोन्ही बाजूने टीकेची तोफ डागली गेली होती. मतदानानंतर काही एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये महायुतीला कौल दिल्याचे चित्र आहे. सकाळ समूहाच्या साम टीव्हीने देखील एक्झिट पोल घेतला.

जालना मतदारसंघात अर्जुन खोतकर यांच्या बाजूने कौल दिला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, हे प्राथमिक अंदाज असून, प्रत्यक्ष निकाल कुणाच्या बाजूने लागतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT