Rupali thombare Patil and Gopichand Padalkar
Rupali thombare Patil and Gopichand Padalkar  Saam TV
महाराष्ट्र

'गोपीचंद पडळकरांसारखी विकृत व्यक्ती...'; रुपाली ठोंबरे पाटील यांची सडकून टीका

साम टिव्ही ब्युरो

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यात जोरदार आरोपीच्या फैरी झडत आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे सर्वच राजकीय मंचावरून पवार कुटुबीयांवर टीका करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या कांदा परिषदेत गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. आता राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (rupali thombare Patil ) यांनी आमदार पडळकरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Maharashtra Politics News In Marathi )

हे देखील पाहा -

गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर रुपाली ठोंबरे पाटील यांनी आमदार पडळकरांचा खरपूस समाचार घेतला आहे. रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, 'गोपीचंद पडळकर हे भाजपचे आमदार आहेत. अशा लोकांना मी राजकीय विकृत औलादी म्हणेल. ते सतत शरद पवार आणि पवार कुटुंबीयांवर तोंडसुख घेत असतात. भाजप नेते स्वत:ला सुसंस्कृत समजतात पण त्याच लोकांच्या या भावना आहेत. केवळ ते बोलू शकत नाहीत, म्हणून ते गोपीचंद पडळकरांसारखी विकृत व्यक्ती पवारांच्या अंगावर सोडतात'. यानंतर पडळकर ज्या भाषेत बोलतील त्याच भाषेत उत्तर देणार, असंही रुपाली ठोंबरे म्हणाल्या.

दरम्यान,आमदार गोपीचंद पडळकरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी घेण्यात आलेल्या कार्यक्रमावरून शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली होती. या कार्यक्रमावरून पडळकरांनी शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका केली होती. त्या भाषणांनंतर धनगर समाज संघटना त्यांच्याविरोधात आक्रमक झाल्या. रविंद्र सखाराम पांडुळे या व्यक्तीने पडळकरांच्या विरोधात तक्रार दिली. गोपीचंद पडळकर यांनी मंगळवारी चौंडी येथे केलेल्या भाषणानंतर त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात होता.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रकची कंटेनरला धडक; १ ठार २ जखमी, वाशिममधील घटना

Abhijit Patil Supports BJP: महाविकास आघाडीला मोठा धक्का! सोलापुरात बड्या नेत्याचा भाजपला पाठिंबा

Todays Horoscope: 'या' राशीच्या लोकांचं नशीब उजळलं; लवकरच गोड बातमी मिळणार, वाचा आजचे पंचांग

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT