Samruddhi Highway Accident News Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg News: समृद्धी महामार्गावर भरधाव कार कंटेनरला धडकली; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, दोघे जखमी

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेत कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले आहेत.

Satish Daud

सचिन बनसोडे, साम टीव्ही शिर्डी

Samruddhi Highway Accident News

समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेत कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले आहेत. ही दुर्देवी घटना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात शुक्रवारी (९ फेब्रुवारी) रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृत व्यक्ती हे जालना जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) अपघाताचं सत्र थांबता थांबत नाहीये. शुक्रवारी रात्री कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात समृद्धी महामार्गाच्या कडेला एक कंटेनर उभा होता.

त्याचवेळी स्विफ्ट कार जालन्याहून शिर्डीच्या दिशेने निघाली होती. अचानक समोर कंटेनर दिसल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच कारने कंटेनरला पाठीमागून धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती, की अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Girija Oak Photos: अभिनेत्री गिरीजा ओकचं नशीब चमकलं, एका रात्रीत बनली 'नॅशनल क्रश'

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा जोरदार धक्का; हजारो कार्यकर्त्यांसह जालन्यातील बडा नेता शिवसेनेत जाणार

परपुरूषाशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी; बायकोचा आयएएस नवऱ्यावर गंभीर आरोप, प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये खळबळ

Maharashtra Live News Update: अजितदादांनी राजीनाम द्ययला हरकत नाही-बच्चू कडू

Govinda Health Update : गोविंदा अचानक बेशुद्ध कसा झाला? डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभिनेत्यानं सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT