solapur, ganpati saam tv
महाराष्ट्र

Ganpati : बाप्पांच्या डाेळ्यातून येऊ लागले अश्रू, भाविकांची अलाेट गर्दी; अफवांवर विश्वासू ठेवू नका : अंनिस (पाहा व्हिडिओ)

यामुळं भाविकांनी हार, फुले अपर्ण करण्यास प्रारंभ केला.

विश्वभूषण लिमये

Ganpati : सोलापुरातील (solapur) होटगी - कुंभारी रस्त्यावरील गणपती मंदिरात (temple) अचानक भाविकांची गर्दी वाढली. ही गर्दी वाढण्याचे प्रमुख कारण तपासलं असता या परिसरात गणपतीच्या डोळ्यातून पाणी येत असल्याचे काेणी तरी सांगितलं. त्यामुळे भाविक उत्सुकतेपाेटी मंदिरात येत हाेते.

भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाल्याने काहींनी हा प्रकार अंनिसच्या कानावर घातला. त्यानंतर भाविकांनी अथवा नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले.

कुंभारी रोडवरील स्वामीनारायण गुरुकुल स्कूलच्या जवळ सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अष्टविनायकांपैकी बेनक गणपती मंदिर आहे. या गणपतीच्या डोळ्यातून अश्रू वाहत असल्याची बातमी हा हा म्हणता परिसरात पसरली. भाविकांनी लागलीच दर्शनासाठी गर्दी करून हार, श्रीफळ अर्पण केले. ही अफवा असून या मागचे शास्त्रीय कारण काय त्याचा शोध घेतल्यानंतर नेमका प्रकार निदर्शनास येईल असे अंनिसच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

15 IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री उदय सामंत निकटवर्गीय सचिन सानप पुणे शिक्षक मतदार संघातून उभे राहणार यावर ठाम.

CJP Shivaji Park Protest: अभिजीत दीपकेंसह 500 जणांविरोधात FIR; शिवाजी पार्क आंदोलनप्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

महायुतीत मोठी बंडखोरी? पुणे शिक्षक मतदारसंघासाठी मंगेश चिवटेंना अर्ज भरण्याच्या एकनाथ शिंदेंच्या सूचना?

Property Inheritance Rules: मृत्यूपत्र न करता वडिलांचं निधन झाल्यास संपत्तीवर पहिला हक्क कोणाचा? मुलाचा की मुलीचा

SCROLL FOR NEXT