Buldhana News Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana News: जळगाव जामोद तालुक्यातील गोराळा धरण फुटल्याची अफवा; 'साम'ची टीम पोहोचली थेट धरणावर

Buldhana News Today: बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरानजीक सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गोराळा धरण हे फुटल्याची अफवा जळगाव जामोद व परिसरात दुपारपासून पसरली आहे.

संजय जाधव

Buldhana Dam News: बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरानजीक सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गोराळा धरण हे फुटल्याची अफवा जळगाव जामोद व परिसरात दुपारपासून पसरली आहे. त्यामुळे मात्र नागरिकांची मोठी धावपळ बघायला मिळत आहे.या अफवेचा रियालिटी चेक साम टीव्ही ने थेट गोराळा धरणावर जाऊन केला आहे. (Latest Marathi News)

जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी जवळपास वीस वर्षे जुने व शंभर टक्के मातीचे असलेले गोराळा धरण आहे. काल या परिसरात झालेल्या ढगफुटी नंतर हे धरण फुटल्याची अफवा जळगाव जामोद शहरात पसरली. त्यामुळे मात्र नागरिकांनी मोठी धावपळ केली. यावरून साम टीव्हीने या धरणावर जाऊन रियालिटी चेक केला आहे आणि प्रत्यक्ष धरण स्थळे भेट देऊन याचा रियालिटी चेक केला आहे. (Buldhana News)

या परिसरात अफवा पसरल्यानंतर पाठबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस सोळंके या परिसरात दाखल झाले. त्यांना साम टीव्हीने विचारलं असता हे धरण 100% मातीचे जरी असलं तरी काल झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणात मोठा पूर आला व त्यामुळे धरणाच्या एका बाजूने पाणी निघण्यासाठी जागा केली व एका बाजूचा भाग धरणाचा जवळपास 30 ते 35 फूट कसला असल्याची माहिती त्यांनी दिली मात्र धरण हे सुरक्षित असल्याची ग्वाही त्यांनी दिलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT