- अजय साेनवणे
Helmet Compulsion : नाशिक (nashik helmet compulsion) पाठोपाठ आता मालेगावात नव वर्षाच्या (New Year 2023) प्रारंभी हेल्मेट सक्तीची होण्याचे संकेत मिळत आहेत. नागरिकांत हेल्मेट बाबतची जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने कंबर कसली आहे. (Maharashtra News)
मालेगाव (malegoan) शहरातील (city) वाढती वाहन संख्या आणि बेशिस्त वाहतूकीमुळे होणारी वाहतूक कोंडी याबरोबरच धूम स्टाईल चालणारे दुचाकीस्वार यामुळे वाहतूक पोलिसांवर ताण पडतोय. त्यामुळे मालेगावात हेल्मेट सक्तीसाठी प्रादेशिक परिवहन विभागाने पुढाकार घेतला आहे.
प्रादेशिक परिवहन विभाग आणि पाेलिस दल नागरिकांत हेल्मेटबाबतची जनजागृती करणार आहेत. त्यासाठी ड्रायव्हिंग स्कुल, आरटीओ एजंट, दुचाकी विक्रेते, सामाजिक संस्था यांचीही मदत घेण्यात येणार आहे. त्यामुळे नव वर्षात (New Year) मालेगावात दुचाकी चालकांना हेल्मेट परिधान करुनच वाहन चालवावे लागणार अशी शक्यता आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.