कार्यालयात थुंकण्यास विरोध केल्याने RTO कर्मचाऱ्याला बेदम मारहाण Saam TV
महाराष्ट्र

कार्यालयात थुंकण्यास विरोध केल्याने RTO कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

इतकेच नव्हे तर संध्याकाळी 6 वाजता कार्यालयाबाहेर पडलेल्या मनीष याला केणे याने आपल्या साथीदारांसह बेदम मारहाण केली.

वृत्तसंस्था

कल्याण : कार्यलयात थुंकण्यास विरोध करणाऱ्या आरटीओ (RTO) लिपिकाला एका एजंटने मारहाण केल्याची घडली कल्याण आरटीओ कार्यलयात आज सायंकाळच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस (Khadakpada Police) ठाण्यात मच्छिंद्र केणे या एजंट विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कल्याणच्या (Kalyan) उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कामासाठी आलेला एजंट मच्छिंद्र केणे हा कार्यलयातच थुंकला. यामुळे आरटीओत कार्यरत असलेले लिपिक मनीष जाधव यांनी त्याला हटकले आणि त्याला कार्यालयाबाहेर जाण्यास सांगितले, यामुळे संतापलेल्या केणे याने मनीष यांना धमकी दिली.

इतकेच नव्हे तर संध्याकाळी 6 वाजता कार्यालयाबाहेर पडलेल्या मनीष याला केणे याने आपल्या साथीदारांसह बेदम मारहाण केली. या मारहाणीत मनीष यांच्या हाताला दुखापत झाली असून या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात मनीष यांनी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान याप्रकरणी मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटना ठाणे विभागाच्या वतीने या घटनेचा निषेध केला असून उद्या ठाणे जिल्ह्यातील चारही आरटीओ कार्यालयातील कर्मचारी लेखणी बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं 30000 रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील 18k- 22k आणि 24k चे दर

Mumbai Crime : मुंबई हादरली! १० वर्षाच्या मुलासमोर महिलेवर बलात्कार; गळ्यावर कोयता ठेवून तडीपार गुंडाचं भयंकर कृत्य

Ketan Agarwal Case: जीव घेणे सोपं झालं का? पुण्यातल केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्री संतापली

Nandurbar : हृदयद्रावक! इकडे बहिणीचा जन्म आणि दुसरीकडे भावाचा मृत्यू; माऊलीच्या आक्रोशाने सातपुडा सुन्न

Maharashtra News Live Update: भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT