RTE Admissions Saam TV
महाराष्ट्र

RTE Admissions : पालकांसाठी आनंदाची बातमी; मोठ्या प्रतीक्षेनंतर आरटीईचे प्रवेश सुरू, 9 लाखांहून अधिक जागा उपलब्ध

RTE admissions begin in Maharashtra : पुणे जिल्ह्यात 5,153 शाळांमध्ये 77,927 जागा रिक्त आहेत. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 2 हजार 836 शाळेमध्ये 36 हजार 147 जागा उपलब्ध असणार आहेत.

Ruchika Jadhav

आरटीई प्रवेश प्रक्रियेकडे लक्ष असलेल्या पालकांना आता 2 महिन्यानंतर दिलासा मिळालाय. बहुप्रतिक्षीत असलेल्या प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थी नोंदणीला अखेर मुहूर्त मिळाला असून आजपासून विद्यार्थी नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (2009) साल 2024-25 या शैक्षणीक वर्षासाठी महाराष्ट्रातील 75,000 हून अधिक शाळांमधील प्रवेश सुरू झालेत. आरटीई प्रवेशाचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल करण्यात आली आहे.

शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जातो. मात्र शालेय शिक्षण विभागाने यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या नियमात बदल केलाय. विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदान शाळा शासकीय शाळा नसल्यास 1 किलोमीटरच्या अंतरावरील स्वयम अर्थसाहित शाळेत प्रवेश दिला जाणार आहे.

दरम्यान, आता ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून यावेळी राज्यातील 75,974 शाळांमध्ये आरटीई मार्फत प्रवेश घेता येणार आहे. या शाळांमध्ये 9 लाख 72 हजार 823 जागा रिक्त आहेत. पुणे जिल्ह्यात 5,153 शाळांमध्ये 77,927 जागा रिक्त आहेत. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 2 हजार 836 शाळेमध्ये 36 हजार 147 जागा उपलब्ध असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wildcat: मांजर कोणत्या बाजूने आडवी गेली तर काय करावं?

Kitchen Hacks: पीठ मळून फ्रिजमध्ये रात्रभर ठेवल्याने शरीराला त्रास होतो का? जाणून घ्या सत्य

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या रोखणार, सरकारचं मोठं पाऊल, टास्क फोर्स नेमकं काय करणार?

Maharashtra Live News Update : राज्यात आज शिवजंयतीचा उत्साह

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

SCROLL FOR NEXT