mohan Bhagwat  saam tv
महाराष्ट्र

mohan bhagwat |'समाजाने आव्‍हानांचा सामना करण्‍यासाठी...'; सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान

समाजाने ही आव्‍हानांचा सामना करण्‍यासाठी सरकार, संस्‍था, संघावर अवलंबून न राहता स्‍वावलंबी झाले पाहिजे, असं मत राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्‍यक्‍त केले आहे.

संजय डाफ

नागपूर : देशापुढे आज अनेक आव्‍हाने आहेत. आपल्या देशात मोठ्या प्रमाणात विविधता आहे. त्यामुळे देशातील सगळ्या नागरिकांना जोडण्यासाठी, संघटीत करण्याची मोठी जबाबदार समाजावर आहे. समाजाने ही आव्‍हानांचा सामना करण्‍यासाठी सरकार, संस्‍था, संघावर अवलंबून न राहता स्‍वावलंबी झाले पाहिजे, असं मत राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी व्‍यक्‍त केले आहे. (Mohan Bhagwat News )

नागपूरात (Nagpur) विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने विदर्भ साहित्य संघ - ग्रंथालयाच्यावतीने वर्षभर राबविण्‍यात आलेल्‍या ‘संस्थांची शतकोत्तर आव्हाने' या व्याख्यानमालेचा समारोप झाला. त्‍यावेळी मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाच्‍या (RSS) शतकोत्‍तर आव्‍हानांवर प्रकाश टाकला. तसेच देशातील विविधतेवर देखील भाष्य केलं.

मोहन भागवत म्हणाले, 'राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ (RSS) हा शतकाकडे वाटचाल करीत असून विपरित परिस्थितीत सर्वांना जोडण्‍याचे काम सातत्‍याने करत आला आहे. प्रामाणिकता, देशभक्‍ती, अनुशासन, ‘स्‍व’चे स्‍पष्‍ट भान, राष्‍ट्राबद्दलच्‍या कल्‍पना व देशाकरीता जगण्‍या-मरण्‍याचा तयारी असलेले लोक संघात आहेत'.

'संघ हा शाश्‍वत असून त्‍याची मूल्‍ये कधीच बदलत नाही. धेयनिष्‍ठा, आत्‍मीयता, अनुशासन आणि आपपरभाव नसणे, हा संघाचा स्‍वभाव असून ज्‍या उद्देशाने डॉ. हेडगेवारांनी संघाची स्‍थापना केली तो उद्देश कार्यपूर्तीपर्यंत तसाच राहील', असा विश्‍वास मोहन भागवत यांनी यावेळी व्‍यक्‍त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : स्किन ग्लोसाठी महागडे प्रोडक्ट्स कशाला फक्त झोप आहे गरजेची; किती तासांची झोप देईल चेहऱ्यावर ग्लो

Monday Horoscope: आजचा दिवस ठरवेल तुमचं नशीब! या 5 राशींना मिळणार मोठी खुशखबर; सोमवारचे खास राशीभविष्य

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

SCROLL FOR NEXT