अकोल्यात RPF ने पकडली ४३ लाखांची रोकड  जयेश गावंडे
महाराष्ट्र

अकोल्यात RPF ने पकडली ४३ लाखांची रोकड

अकोला रेल्वे स्थानकावर सुमारे ४३ लाखांपेक्षा जास्त रुपयांची हवाल्याची रोकड रेल्वे सुरक्षा बलाने बुधवारी रात्री पकडली. यामध्ये एकास ताब्यात घेतले आहे.

जयेश गावंडे

अकोला : अकोला रेल्वे स्थानकावर सुमारे ४३ लाखांपेक्षा जास्त रुपयांची हवाल्याची रोकड रेल्वे सुरक्षा बलाने बुधवारी रात्री पकडली. यामध्ये एकास ताब्यात घेतले आहे. ही रक्कम हवाल्याची असल्याने अकोला रेल्वे लोहमार्ग पोलिस (जिआरपी) यांना आरोपीसह सपुर्द केली आहे.

हे देखील पहा -

अकोला स्थानकातून मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेस क्रमांक 02106, B4 च्या डब्यातून एक प्रवाशी 43 लाख तीनशे रुपये रोख रक्कम नेत असल्याची गोपनीय माहिती आरपीएफ पोलिसांना प्राप्त झाली होती. पोलिस अधिकारी बी.आर.अंभोरे यांनी त्यांचे सहकारी लक्ष्मीनारायण यांना त्या संशयित व्यक्तीवर नजर ठेवण्यास सांगितले.

सदर व्यक्तीची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्या व्यक्तीस ताब्यात घेऊन त्याला पोलीस ठाण्यात आणले व त्याच्याकडील काळ्या रंगाच्या बॅगेची झाडाझडती घेतली असता तब्बल ४३ लाखांची रोकड आढळून आली.

मनोज हरीराम शर्मा, (वय 22 वर्षे, शास्त्रीनगर, अकोला ) असे सदर आरोपीचे नाव असून, रेल्वे सुरक्षा दलाच्या या कारवाईत एकाच व्यक्तीला पकडण्यात आले आणि जो व्यक्ती ही रक्कम घेण्यासाठी आला, त्याला ते पकडू शकले नाही. रेल्वे सुरक्षा दलाने हे प्रकरण रेल्वे लोहमार्ग पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. त्यामुळे जिआरपी या प्रकरणात मनोज शर्मा याची कसून चौकशी करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai–Nanded Weekly Special Trains: सणासुदीच्या काळात प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई–नांदेड दरम्यान ४ विशेष गाड्या सुरू

पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात मोठा राडा; वकील आणि IPS महिला अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची, व्हिडिओ व्हायरल

Kalyan Traffic : कल्याण पोलिसांचा वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठा निर्णय; नवरात्रौत्सव काळात जड वाहनांना बंदी

Maharashtra Live News Update: पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणी ५ जणांना पोलीस कोठडी

Maharashtra Investment : राज्यात ८०,९६२ कोटींची गुंतवणूक; ४०,३०० रोजगार निर्मिती होणार, कोणत्या जिल्ह्यांना थेट फायदा?

SCROLL FOR NEXT