rpf police from solapur saved a child great salute to solapur rpf police  विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

कड्डक सॅल्यूट! चिमुकल्याला स्टेशनवरच आला तापाचा झटका; मदतीला आला वर्दीतला देव

Solapur Latest News: आरपीएफ जवानांनी केलेल्या या माणुसकीच्या (Humanity) कामगिरीमुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होतंय.

विश्वभूषण लिमये

सोलापूर: आयुष्यात कधी काय संकट येईल हे काही सांगता येक नाही, हे खरं असलं तरी त्या संकटात कोण कधी कामी येईल हेही सांगता येणार नाही. असाच एक प्रत्यय आलाय धसाडे कुंटुंबियांना. या कुटुंबातील चिमुकला 'ओवी' याच्यावर संकट आलं, पण त्या संकटातू त्याला बाहेर काढण्यासाठी कर्तव्यावर असलेले आरपीएफ जवान खाकी वर्दीच्या रुपात देवासारखे धावून आले आणि या चिमुकल्याला जीवनदान दिले. (rpf police from solapur saved a child great salute to solapur rpf police)

हे देखील पहा -

त्याचं झालं असं की, श्रीकांत धसाडे हे आपल्या कुटुंबासह उद्यान एक्सप्रेसने पुण्याला (Pune) निघाले होते. मात्र, सोलापूर (Solapur) रेल्वे स्थानकात त्यांचा लहान मुलगा 'ओवी' याला अचानक तापाचा झटका (fever attack) आला. त्यावेळी त्यांनी मदतीसाठी टाहो फोडला. हा प्रकार लक्षात येताच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कर्तव्यावर असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे (RPF) पोलीस निरीक्षक सुहास जाधव (Suhas Jadhav) आणि हवालदार बालाजी नाबदे (Balaji Nabade) यांनी तात्काळ त्या मुलाला धावत धावत रेल्वे स्थानकावरील वैद्यकीय कक्षात दाखल केले. त्यानंतर लगेचच पुढील उपचारासाठी सोलापूरातील खासगी रुग्णालयात सोय केली. आरपीएफच्या जवानांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे दोन वर्षांचा चिमुकला ओवी याला वेळेत उपचार मिळाले आणि त्याचा जीव वाचला. आरपीएफ जवानांनी केलेल्या या माणुसकीच्या (Humanity) कामगिरीमुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होतंय. चिमुकल्यावर आलेल्या संकटाला थेट खाकी वर्दीतला देवच नडला अशी भावना व्यक्त केली जातेय.

वयाच्या सहाव्या महिन्यापासून पाच वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींमध्ये १००.४ डिग्री फॅरनहाईटच्या पुढे ताप आल्यास मेंदूशी निगडित इतर जंतुसंसर्ग नसताना येणारे झटके, म्हणजे तापात येणारे झटके. जवळपास २ ते ५ % मुलामुलींना ६ वर्षांपर्यंत एकदा तरी तपात झटका येतो.

साधे म्हणजे सिंपल आणि गुंतागुंतीचे म्हणजे कॉम्प्लेक्स असे दोन प्रकार असतात.

१) साधे म्हणजे सिंपल आणि गुंतागुंतीचे म्हणजे कॉम्प्लेक्स असे दोन प्रकार असतात.

२) तापातील साधे झटके म्हणजे १५ मिनिटांपेक्षा कमी काळ चालणारे, पूर्ण शरीराला २४ तासांत एकदाच येणारे असतात.

३) गुंतागुंतीचे झटके १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ चालतात. ते शरीराच्या एका भागावर २४ तासांत वारंवार येतात.

काही मुलांना जास्त ताप आल्यास झटका येतो. ताप उतरल्यावर झटके थांबतात. मेंदूला किंवा मेंदूच्या आवरणाला सूज आल्यास झटके येतात. धनुर्वात (हल्ली हा आजार आढळत नाही) काही विषारी पदार्थ पोटात गेल्यास. अपस्मार, फेफरे (पुढील आयुष्यातही टिकते). शरीरातले चुन्याचे प्रमाण कमी झाल्यास. डोक्यास मार लागून मेंदूला धक्का पोचला असल्यास. नवजात अर्भकांत शरीरातील चुना (कॅल्शियम) कमी झाल्यास किंवा शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यास झटके येतात. नवजात अर्भकाचे झटके ओळखणे अवघड असते. या वयातले झटकेदेखील काही स्नायू भागांपुरतेच मर्यादित असतात. हाताचे स्नायू आखडणे, पाय सारखा जवळ ओढणे, पाठ जमिनीपासून उंचावून ताणून धरणे, मान वाकडी करणे, डोळे फिरवणे अशा विविध स्वरूपांत हे झटके येऊ शकतात. थोडयाशा अनुभवानंतर हे कळू शकते. अर्थात बाळाच्या आईला बाळाचे हे 'वेगळे वागणे' कळते. त्या मानाने मोठया मुलांना किंवा माणसांना आलेले झटके कळणे सोपे असते.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: चुकीच्या वक्तव्याची तुलना द्वेषपूर्ण भाषणाशी होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले

Numerology: या तारखेला जन्मलेल्या व्यक्ती असतात लकी; प्रेमात अन् करिअरमध्ये मिळते यश

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

Gold Price Today: 5000 हजारांनी स्वस्त झाल्यानंतर सोन्याचे भाव वाढले; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Devendra Fadanvis : मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

SCROLL FOR NEXT