Kolhapur Saam
महाराष्ट्र

Kolhapur goons: कोल्हापुरात गावगुंडांचा राडा; आधी फुकट दारू, नंतर बाटल्यांची तोडफोड, VIDEO समोर

Hotel Vandalized Manager Assaulted: कोल्हापुरात गावगुंडांचा हैदोस पाहायला मिळाले आहे. काही गावगुंडांनी दारू पिऊन हॉटेलची तोडफोड केली. घटना सीसीटीव्हीत कैद.

Bhagyashree Kamble

रणजीत माजगावकर, साम टीव्ही

कोल्हापुरात गावगुंडांचा हैदोस पाहायला मिळाला आहे. काही गावगुंडांनी दारू पिऊन हॉटेलची तोडफोड केली. तसेच मॅनेजर आणि वेटरला देखील मारहाण केली. गावगुंडांनी घातलेला हैदोस सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी गावगुंडांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, पोलिसांनी गावगुंडांवर अद्याप कुठलीच कारवाई केलेली नाही.

कोल्हापूर सांगली या मार्गावरील अतिग्रे फाट्यावर सागरीका हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये रात्री नऊ ते साडेदहा वाजता काही गावगुंड आले. त्यांनी दारू प्यायली. नंतर गावगुंडांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला. गावगुंडांनी हॉटेलची तोडफोड केली. तसेच त्यांनी दारूचे पैसेही दिलेले नाही. दारूच्या नशेत त्यांनी हॉटेलचे मॅनेजर आणि वेटरवर हल्ला केला. हे संपूर्ण प्रकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

गावगुंडांनी घातलेल्या हैदोसानंतर मॅनेजर आणि वेटरने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीत त्यांनी गावगुंड दर आठवड्याला येऊन फुकट दारू पितात आणि हैदोस घालतात, अशीही तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी ओमकार शिंदे, आदित्य नावाच्या गावगुंडांसह इतर ८ गावगुंडांविरोधात गुन्हा दाखल केला.

वर्ध्यात ऑनलाईन जुगारावर पोलिसांचा छापा

अवैधरीत्या सुरू असलेल्या ऑनलाइन जुगारावर दोन ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला आहे. ही कारवाई वर्धा शहरालगत असलेल्या बोरगाव मेघे येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली आहे. याप्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी एकूण एक लाख ४६ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Cheapest Recharge: मोबाईल डेटा संपतोय लवकर? जिओचे ५० रुपयांखालील डेटा प्लॅन ठरतील बेस्ट पर्याय

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

IND vs AUS : कोहली-रोहितची आज अग्निपरीक्षा, पर्थमध्ये पहिला वनडे, वाचा प्लेईंग ११ अन् सर्वकाही

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

SCROLL FOR NEXT