Sambhaji Brigade On Appasaheb Dharmadhikari: ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. दोन दिवसांपुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दलची घोषणा केली होती.
मात्र सध्या एक महत्वाची बातमी समोर येत असून आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घ्यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्वरित परत घेण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी याबाबत पत्रक काढले आहे.
ज्यामध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्वरित परत घ्यावा अन्यथा संभाजी ब्रिगेड, जनआंदोलन उभे करेल, असे सांगण्यात आले आहे. तसेच त्यानंतर होणाऱ्या परिणामाची जबाबदारी ही राज्य सरकारची असेल, असा इशारा देखील संभाजी ब्रिगेडने दिला आहे.
याबद्दल बोलताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते शिवानंद भानुसे म्हणाले की, "महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार महाराष्ट्रातील लोकजीवन, महाराष्ट्रातील सांस्कृतिक जीवन किंवा विविध क्षेत्रातील काही वेगळं काम करणारा जो कोणी व्यक्ति असेल त्यांचा या यानिमिताने सत्कार केला जावा. आप्पा धर्माधिकारी यांना समाजसेवा म्हणून पुरस्कार दिला गेला आहे."
"मात्र त्यांच्या हातून अशी कुठलीही समाजाची सेवा घडल्याचं आम्हाला माहिती नाही. कारण की ते पूर्णतः आरएसएसचे काम करतात. रामदासी बैठका घेतात. तसेच सर्वसामान्य माणसांची, महिलांची, तरुणांची दिशाभूल करतात. असा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, " या राज्याला जो जिजाऊ, शिवरायांचा एक वारसा लाभलेला आहे. समतावादी, समानतावादी, मानवतावादी त्या सर्व बाजूंनी जर विचार केला तर त्यांना त्याचा पूर्णपणे विरोध आहे. आणि अशा लोकांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणे हे अत्यंत चुकीच आहे. ही आमची मूळ भूमिका असल्याचेही संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) म्हटले."
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.