Rohit Pawar  Saam Tv
महाराष्ट्र

Rohit Pawar News : आजारी मुलगा, राहायला घर नाही... संघर्ष यात्रेदरम्यान रोहित पवारांनी मांडली गोदाबाईंची व्यथा

प्रविण वाकचौरे

Rohit Pawar News :

राष्ट्रवादीचे युवानेते आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सध्या बीडच्या गेवराई येथे पोहोचली आहे. रोहित पवार या यात्रेदरम्यान गावागावातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. गेवराईच्या जातेगाव येथे रोहित पवार यांची गोदाबाई यांच्याशी भेट झाली.

अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत गोदाबाई जीवन जगत आहे. रोज जगताना त्यांना नवा संघर्ष करावा लागत आहे. त्यांची ही व्यथा रोहित पवार यांनी व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर मांडली आहे. तसेच गोदाबाई यांना मदत करण्याची विनंती देखील रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना देखील टॅग केलं आहे.

रोहित पवार यांनी व्हिडीओ शेअर करत आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं की, आदरणीय मुख्यमंत्री साहेब, या आहेत गोदाबाई. युवा संघर्ष यात्रा गेवराई तालुक्यातील जातेगावातून जात असताना गोदाबाई यांची भेट झाली. त्यांच्या मुलाच्या हृदयाला होल आहे. मुलाचं ऑपरेशन कसं करायचा याचा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्याचे घर देखील पत्र्याचे आहे, पक्के घर नाही. गॅस आहे पण गॅस भरायला परवडत नाही म्हणून, गॅस कोपऱ्यात फेकून चुलीवर स्वयंपाक करतात. टॉयलेट बांधला पण टाकी बांधली नाही, टॉयलेटचे अनुदान कोणीच परस्पर काढून नेले.  (Latest Marathi News)

सर्वात दुःखद म्हणजे दूध घ्यायला परवडत नाही म्हणून त्या नातवंडांना बिना दुधाच्या चहामध्ये पाव खायला देतात. या माउलीच्या अशा एक ना अनेक प्रश्नांनी माझ्यासह उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आलं. साहेब, शासन आपल्या दारीचे मोठमोठे कार्यक्रम - इव्हेंट करून ,योजनेत 'आपल्या दारी'नाव असेल म्हणजे शासन लोकांच्या दारी पोहचत नसते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साहेब, व्यथा समजून घेण्यासाठी सोन्याचा चमचा घेऊन जन्मने अथवा साधा चमचा घेऊन जन्मने याचा काही संबंध नसतो,तर लोकांच्या व्यथा समजण्यासाठी केवळ प्रामाणिकपणा आणि संवेदना गरजेच्या असतात. तो प्रामाणिकपणा आणि व्यथा आपल्या कडे देखील असतीलच असे समजून गोदाबाईच्या कुटुंबाच्या व्यथा आपण सोडवाव्यात ही विनंती करतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

SCROLL FOR NEXT