Rohit Pawar News saam tv
महाराष्ट्र

Political News: अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास मला आनंद होईल, पण…; रोहित पवार स्पष्टच बोलले

Rohit Pawar News: “अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास मला आनंद होईल, पण…”; पाहा काय म्हणाले रोहित पवार…

Shivani Tichkule

Maharashtra Politics: अजित पवार हे आज ना उद्या मुख्यमंत्री होतीलच, असे विधान राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलं. पटेल यांच्या या मोठ्या विधानानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर आता आमदार रोहित पवार यांनीही मोठं विधान केलं आहे. (Latest Marathi News)

ते म्हणाले की, अजितदादा (AJit Pawar) मुख्यमंत्री झाले तर पुतण्या म्हणून मलाही त्याचा आनंद होणार आहे. परंतु विषय एवढाच आहे की ज्या विचाराच्या विरोधात आपण काम करत आलो आहोत. आज पर्यंत त्या विचारा बरोबर राहून जर ते मुख्यमंत्री बनत असेल तर महाराष्ट्राचा नागरिक म्हणून कुठेतरी मला नाराजगी वाटेल.

पण तुम्ही जर बघितलं तर भाजप खूप हुशार आहे. अजित दादांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा कुठेही लोकांमध्ये मीडियामध्ये व्यक्त केली नाही. एकदा फक्त एक स्टेटमेंट केलं होतं पण सत्तेत आल्यापासून त्यांनी त्याबाबतीत काय बोललेलं नाही. ह्या ज्या वावड्या उठवल्या जात आहेत. त्या आसपासच्या लोकांकडे केल्या जातात. पण ह्याच्यामागे अजून एक भूमिका असू शकते जी आम्हाला वाटते असं देखील रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले.

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, शिंदे गटाच्या लोकांना भीती वाटते की अजित दादांना मुख्यमंत्री केलं जाईल आणि अजित दादांच्या गटाला असं वाटतंय की दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे. पण हा वाद कदाचित दादांमध्ये आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये नसेलही. पण तो वाद कदाचित भाजपकडून मुद्दामून लावला जातो का काय.

दोघांमध्ये वाद झाला तर कदाचित एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहणार नाहीत आणि कदाचित दादा ही मुख्यमंत्री बनणार नाही. ह्या दोघांचा वाद असल्यामुळे आणि तो वाद पुढे दाखवून कदाचित भाजपचाच मुख्यमंत्री होईल अशी टीका देखील रोहित पवार यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

जनगणनेत OBC प्रवर्ग का नाही? राहुल गांधींचा पत्रातून पंतप्रधानांना सवाल

मराठी सक्तीला भाजपचा विरोध? मराठीची सक्ती, UP निवडणुकीची भिती?

Maharashtra News Live Update: कांद्याचे भाव पाडण्याचा डाव,दिल्लीला कांदा पाठवण्यास शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध

Politics: भाजपचा 'एकला चलो'चा नारा, मित्र पक्षासोबत युती तोडली; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT