Rohit Pawar Saam tv
महाराष्ट्र

Rohit Pawar: 'ते ५ पलंग नेमके कुणासाठी?' वाल्मीक कराड प्रकरणी रोहित पवारांचा थेट निशाणा

Rohit Pawar on Cot Controversy: पोलीस ठाण्यात पलंग मागवताच बीड पोलिसांनी तातडीनं खुलासा केलाय. बीड पोलीस ठाण्यात पलंग नव्हे, तर पोलीस शिपायांसाठी कॉट आणले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Bhagyashree Kamble

दिवंगत संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. खंडणी प्रकरणी वाल्मीक कराडला अटक केल्यानंतर, बीड पोलीस ठाण्यात नवीन ५ पलंग मागवण्यात आले आहेत. या ५ पलंगावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित करत पोलीस आणि सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी या प्रकरणावरून ट्विट केलंय. अचानक पलंग कसे मागवले? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

आमदार रोहित पवार यांनी एक्सवर यासंदर्भातली पोस्ट शेअर केली आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं, 'बीड पोलीस ठाण्यात नवीन ५ पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत. नवीन पलंग हे स्टाफसाठी मागवले असे स्पष्टीकरण प्रशासनाकडून दिले जात आहे. मात्र, एवढी तत्परता राज्यातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी का दाखवली नाही? आजच अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत.

शिवाय सर्वच पोलीस ठाण्यात गादी-उशी ,पंखा, एसी हे देखील बसवता येतील का? याचाही विचार व्हावा, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. दरम्यान, पोलीस ठाण्यात पलंगाच्या बातम्या येताच, याप्रकरणी पोलिसांनी खुलासा केला आहे. बीड पोलीस ठाण्यात पलंग नव्हे, तर पोलीस शिपायांसाठी कॉट आणले असल्याची माहिती त्यांनी दिली.

राम शिंदे विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल रोहित पवारांची प्रतिक्रिया

भाजपचे आमदार राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याने जिल्ह्यातील सर्वच पक्षाच्या वतीनं सत्कार होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वच पक्षातील आमदार आणि खासदारांना निमंत्रण देण्यात आलंय. तर आमदार रोहित पवारांना देखील निमंत्रण देण्यात आलंय. मात्र मी नागपूर आधिवेशनादरम्यान राम शिंदे यांचा कर्जत-जामखेडचा लोकप्रतिनिधी म्हणून संविधानिक पद मिळाल्याबद्दल सत्कार केलाय. त्यांना संविधानिक पद मिळाल्याबद्दल कुठलाही भेदभाव न करता मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील कामे करतील, असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात अ‍ॅनालॉग पनीरवर बंदी, ग्राहकांची कृत्रिम पनीरपासून सुटका

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस, आयएमडीचा इशारा

शिक्षक बदली घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई; 33 शिक्षक निलंबित, 65 जणांची वेतनवाढ थांबवली

MPSC परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

धक्कादायक! खड्ड्यांमुळे रिक्षातच प्रसूती; भिवंडीत प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड

SCROLL FOR NEXT