Rohit Pawar On Ajit Pawar saam tv
महाराष्ट्र

Rohit Pawar: आताचे दादा आणि पूर्वीचे दादा फार वेगळे आहेत : रोहित पवार

Rohit Pawar On Ajit Pawar: आताचे दादा आणि पूर्वीचे दादा फार वेगळे आहेत कदाचित त्यांच्या मनात पवार साहेबांची भीती निर्माण झाली आहे, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

विनोद जिरे

Rohit Pawar On Ajit Pawar:

''भाजप हा एक व्हायरस आहे आणि या भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना तो व्हायरस लागतो. आताचे दादा आणि पूर्वीचे दादा फार वेगळे आहेत कदाचित त्यांच्या मनात पवार साहेबांची भीती निर्माण झाली आहे. म्हणून ते बारामतीत'', असं बोलले, असं म्हणत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी भाजप आणि अजित पवारांवर टीका केली आहे.

याआधी बारामतीत भाषण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकांना आवाहन केलं होतं की, ''आता लोक भावनिक करतील भावनेला बळी पडू नका, एवढे दिवस त्यांना (शरद पवार यांना) साथ दिली. आता आम्हाला साथ द्या.'' यावरच निशाणा साधत बीडमध्ये माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार असं म्हणाले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी ते म्हणाले की, ''अजित दादांकडून हे अपेक्षित नाही. जे दादा आम्ही पाहिलेत, ज्या दादांना आम्ही ओळखतो ते दादा फार वेगळे होते. ते भाजपबरोबर गेल्यानंतर भाजपचा विचार हा कुठेतरी त्यांना लागलाय की काय? असं म्हणावं लागेल.'' (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''नाहीतर अजून एक गोष्टीची भीती वाटते भाजपाला नाही तर दिल्लीतल्या लोकांना, कुठेतरी वाटावं की, आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात आम्ही काम करत आहोत. म्हणून अशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन काही वक्तव्य होत असेल, तर हे योग्य नाही.''

रोहित पवार पुढे म्हणाले की, ''माझे एकच मत आहे, आपण सत्तेत आहात, सत्तेत तुम्ही शेतकऱ्यांना काय देतात? कष्टकऱ्यांना काय देतात ? विद्यार्थ्यांना काय देतात ? बेरोजगारी युवांसाठी तुम्ही काय करतात ? ते पाहिलं पाहिजे. सातत्याने तुम्ही वय काढत चाललात तर, यावरून असं दिसतंय की कुठेतरी त्यांच्या मनात भीती आहे. भाजपा व्हायरस आहे आणि तो व्हायरस कदाचित तिथे गेलेल्या नेत्यांना लागतो, असंच कुठेतरी आम्हाला म्हणावं लागेल.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT