रोहित पवारांनी फडणवीसांवर केली 'हि' टीका...  Saamtv
महाराष्ट्र

रोहित पवारांनी फडणवीसांवर केली 'हि' टीका...

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना २०१९ ची पूर परिस्थिती हाताळण्यात कमी पडले होते. अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना २०१९ मध्ये आलेली पूरस्थिती हाताळण्यात कमी पडले होते. अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केली आहे. राज्यातील पुरस्थितीचे महाविकास आघाडी सरकारने योग्य नियोजन केले आहे. राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटक सरकारशी बोलणी करून अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास भाग पाडले आहे, असेही ते म्हणाले.

हे देखील पहा -

सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची आज रोहित पवारांनी पाहणी केली. तसेच या भागातील पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे व किटचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्रातील पुरस्थितीमध्ये राज्यातील महाविकास आघाडी सरकार उत्तमपणे काम करत असून, यंदा जलसंपदा विभागाचा अंदाज चुकला नाही. या पुरस्थितीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि जलसंपदा विभागाने चांगले काम केले आहे. असे गौरवोद्गारही आमदार रोहित पवार यांनी काढले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bangladesh: आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग; धुराच्या काळोखात विमानतळ गुडूप, धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी

Ind vs Aus : विराट कोहली-रोहित शर्माचं कमबॅक लांबणीवर? ऑस्ट्रेलियाच्या पर्थमधून आली सर्वात धक्कादायक अपडेट

Pneumonia Symptoms: न्यूमोनिया कोणता आजार आहे? त्याची लक्षणे कोणती?

२१ दिवस गव्हाची चपाती नाही खाल्ली तर? शरीरात दिसतील आश्चर्यकारक बदल, तज्ज्ञ सांगतात..

SCROLL FOR NEXT