Pankaja Munde Saam Tv
महाराष्ट्र

Pankaja Munde: रोहित पवारांचा आत्मविश्वास कमी झालाय; बोगस मतदानाच्या आरोपांवरती पंकजा मुंडेंचं उत्तर

Pankaja Munde: बीड लोकसभेसाठी मतदानासाठी पैसे वाटले असा आरोप आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली होता. आता भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलंय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजीत सोनवणे, साम प्रतिनिधी

नाशिक: मनोज जरांगे पाटील आणि पंकजा मुंडे यांच्या आरोप प्रत्यारोपामुळे बीड लोकसभेचं राजकारण ढवळून निघालं आहे. दरम्यान बीड लोकसभेसाठी मतदान पार पडलं असले, तरी आरोपांच्या फैरी अजून झडत आहेत. परळी आणि बीड लोकसभा मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा आरोप करणाऱ्या रोहित पवार यांना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलंय.

निवडणूक झाल्यावर रोहित पवार यांनी असं बोलणं हे त्यांचं आत्मविश्वास कमी झाल्याचं लक्षण आहे. आम्ही विरोधीपक्षात असताना त्यांनी 15 आमदार लावले होते, तेव्हा त्यांनी हेच आरोप केले होते, असं पंकजा मुंडे म्हणालेत. बीड लोकसभेसाठी मतदानासाठी पैसे वाटले असा आरोप आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली होता.

महाराष्ट्राच्या राजकारणाला आदर्श घालून देणाऱ्या बीड जिल्ह्यात दडपशाहीचे हे प्रकार सत्ताधाऱ्यांना शोभत नसल्याचंही ते म्हणाले होते. रोहित पवार यांनी दोन व्हिडिओ शेअर करत बोगस मतदानाचा आरोप केला. रोहित पवार यांनी दोन व्हिडिओ शेअप करत निवडणूक आयोगाला विचारणा केली होती. निवडणूक आयोग करणार का फक्त विरोधकांवर आचारसंहितेचे गुन्हे दाखल करून धन्यता मानणार? अशी विचारणा त्यांनी केली होती. रोहित पवाराच्या आरोपांवर पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलंय आहे.

परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान झाले असेल तर ज्याची कोणाची तक्रार आहे त्यांनी इलेक्शन कमिशनला करावी. असं घडलं असतं तर मी इथे उभी नसते. रोहित पवारांना उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या. सलग पाचवी निवडणूक आम्ही हॅण्डल करतो आहोत. आम्ही विरोधी पक्षात असताना त्यांनी १५ आमदार लावले होते. निवडणूक झाल्यानंतरही असे आरोप करणे हे त्यांचा आत्मविश्वास कमी झाल्याचं दाखवत आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filling 2026: आयटीआर फाइल करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक; आताच तयार ठेवा, अन्यथा येईल अडचण

मुंबई ते नवी मुंबई विमानतळापर्यंत प्रवास जलद होणार; मेट्रो ८ च्या कामाला वेग, गोल्डन मार्गावर किती स्टेशन असणार?

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी

Health warning signs: किडनी आणि लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात दिसतात हे बदल; डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती

Pune Summer Tourism: सहलीला जायाचा...! उकाड्यापासून सुटका हवीये? पुण्याजवळची ही 8 थंडगार ठिकाणे पाहाच

SCROLL FOR NEXT