रोहा ते वीर रेल्वेमार्ग झाला दुपदरी; मुंबई ते वीर लोकल सुरू होणार?
रोहा ते वीर रेल्वेमार्ग झाला दुपदरी; मुंबई ते वीर लोकल सुरू होणार? राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

रोहा ते वीर रेल्वेमार्ग झाला दुपदरी; मुंबई ते वीर लोकल सुरू होणार?

साम टिव्ही ब्युरो

राजेश भोस्तेकर

कोकण रेल्वेने (Konkan Railway) प्रवाशाच्या गतिमान प्रवासासाठी पावले उचलली असून रोहा ते वीर हा ४६ किमीचा रेल्वेमार्ग दुपदरी केला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास हा गतिमान आणि अडथळ्याविना होणार आहे. रोहा ते पनवेल हा रेल्वेमार्ग आधीच दुपदरी झालेला आहे. त्यामुळे पनवेल ते वीर हा रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचा प्रवास हा आता गतिमान होणार आहे. रोहा ते वीर या रेल्वे मार्गावरील एका बाजूने विद्युतीकरण कामही पूर्ण झाले असून दुसऱ्या बाजूचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे लवकरच या मार्गावर लोकल सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रोहा ते वीर या रेल्वेमार्गावर दुपदरीकरणं अपूर्ण असल्याने अनेक वेळा लांब पल्याच्या गाड्या येताना दुसऱ्या गाड्यांना स्टेशनवर थांबावे लागत होते. मात्र आता दुपदरी करणं काम पूर्ण झाल्याने ही अडचण दूर झाली आहे. रोहा ते वीर मार्गावरील कोंडी दूर होणार असल्याने प्रवासाचा वेळही वाचणार आहेत. या कामासाठी ५३० कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत. दरम्यान, कोकण मार्गावरील प्रवास वेगवान करण्यासाठी रोहा ते ठोकूर असे ७०० किलोमीटर मार्गाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण करण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे.

आता कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते वीर या ४६.८ कि.मी. रेल्वे मार्गावरील दुपदरीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावर गाड्या जास्त वेळ न थांबविता कमी कालावधीत कोंडी दूर होणार असल्याने प्रवासाचा वेळही वाचणार आहे. या मार्गावर एका बाजूचे विद्युतीकरण काम पूर्ण झाले आहे.

कोकण रेल्वेची हद्द रोहा ते ठोकूरपर्यंत आहे. मध्य रेल्वेच्या हद्दीतील रोहा ते कोकण रेल्वेच्या रत्नागिरीतील वीरपर्यंत ४६.८ कि.मी. अंतराचे दुपदरीकरणाचे काम ३० ऑगस्ट रोजी पूर्ण झाले. तसेच रेल्वेमार्गावर गाड्या चालविण्याची क्षमता वाढणार असून ट्रेन संचालनातील कार्यक्षमता वाढणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली. पनवेल ते वीर हा रेल्वेमार्ग दुपदरी झाल्याने हा प्रवास गतिमान होणार असून भविष्यात या मार्गावर मुंबईवरून लोकल सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Loksabha: बारामतीत प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! ५० वर्षांनंतर शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान बदललं; दादांनी मारली बाजी

Mumbai News: मुंबईत सापडला बनावट नोटांचा कारखाना; निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांची मोठी कारवाई, दोघांना अटक

Buldhana Crime News: संतापजनक! दुचाकीस्वाराला धडक दिली, जखमीला उपचारासाठी नेतो सांगून दरीत फेकलं; आरोपीला अटक

Diabetes Problem : डायबेटीजने त्रस्त महिलांनी हे फळ रोज खावे; रक्तातील साखर लगेचच कंट्रोलमध्ये येणार

Beed News: मोठी बातमी! निवडणुकीआधी बीडमध्ये सापडलं पैशाचं घबाड, कारमधून तब्बल १ कोटींची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT