सांगोला जवळ डीसीसी बँकेच्या शिवणे गावातील शाखेवर दरोडा... भारत नागणे
महाराष्ट्र

सांगोला जवळ डीसीसी बँकेच्या शिवणे गावातील शाखेवर दरोडा...

सात लाखांची रोकड चोरट्यांनी पळवली

भारत नागणे

पंढरपूर - सांगोला जवळ असलेल्या वाकी शिवणे गावातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेवर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकला. यामध्ये सात लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी पळवून नेली. या घटनेनंतर सांगोला तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा -

येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेचे चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. बँकेतील लॉकर ही गॅस कटरच्या सहाय्याने कट करून लॉकरमध्ये ठेवलेली सात लाख रुपयांची रोकड चोरट्याने पळवून नेली शिवाय बँकेतील महत्त्वाचे कागदपत्र व दस्तऐवज चोरट्यांनी जाळून टाकले आहेत.

ही घटना आज सकाळी येथील ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर याची माहिती सांगोला पोलिसांना देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश्री पाटील सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप आदींसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEET पेपरफूटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई! RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगांवकरांना CBI ने ठोकल्या बेड्या

Maharashtra News Live Update: NEET पेपर फुटीप्रकरणी RCC क्लासचे शिवराज मोटेगावकर यांना अटक

Hair Cut: नवदीचा 'बॉब' हेअरकट पुन्हा ट्रेंडमध्ये; पाहा तुमच्या चेहऱ्यानुसार कोणता कट दिसेल परफेक्ट

Kerala CM Oath Ceremoney : मोठी बातमी! केरळच्या मुख्यमंत्रीपदी व्ही. डी. सतीशन, दिग्ग्ज नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ

Cannes Festival-Ashok Saraf : 'कान्स'मध्ये मराठीचा डंका! अशोक मामांनी केली हटके एन्ट्री, निवेदिता सराफ यांच्या लूकने वेधले लक्ष | VIDEO

SCROLL FOR NEXT