दरड कोसळल्याने, मनिबेली ते जांगठी रस्ता बंद...  दिनू गावित
महाराष्ट्र

दरड कोसळल्याने, मनिबेली ते जांगठी रस्ता बंद...

महाराष्ट्राच्या विधानसभा आणि लोकसभा मतदार यादीतील पहिलं गाव अक्कलकुवा तालुक्यातील मनिबेली आज देखील विकासापासून दूर

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : महाराष्ट्राच्या विधानसभा आणि लोकसभा मतदार यादीतील पहिलं गाव अक्कलकुवा तालुक्यातील मनिबेली आज देखील विकासापासून दूर आहे. जांगठी ग्रामपंचायत अंतर्गत चापट्टीपाडा, मनिबेली गावादरम्यान ३ किलोमीटर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाल्याने नागरिकांना रहदारीसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.

या भागात आज देखील डांबरीकरणाचे रस्ते झाले नाहीत. ठेकेदारद्वारे माती आणि खडी टाकून तयार केलेल्या या रस्त्यावरून पायी चालणे देखील कठीण झाले आहे. मोटरसायकल आणि चारचाकी वाहन जाऊ शकत नाही. या भागातील मोटरसायकल स्वरांना ३ किलोमीटर आपल्या वाहनाला धरून मार्गक्रमण करावे लागते. आजारी माणसांना तर (झोळीतून) बांबूलेन्सद्वारे दवाखान्यापर्यंत घेऊन जावे लागत आहे.

हे देखील पहा-

दुर्गम भागातील या गाव पाड्यांना ये- जा करण्याकरिता प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री योजनेच्या नावाखाली रस्ते मंजूर केले जातात. परंतु, लोकप्रतिनिधी, अधिकारी, ठेकेदार यांच्या भ्रष्ट कारभारामुळे रस्त्यांचे कामच पूर्ण होत नाही. दुर्गम भागातील अनेक रस्ते १० वर्षापासून काम सुरू असताना देखील अद्याप डांबरीकरण झाले नाही. ज्या रस्त्याचे काम झाले आहे. ते वर्षभरातच खराब होतात.

जांगठीहून नर्मदा नदीच्या काठापर्यंत असलेल्या चिमलखेडी रस्त्याची देखील हीच अवस्था आहे. मागील आठवड्यातच चांदसैली घाटात दरड कोसळल्याने उपचाराअभावी एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली होती. जांगठी ग्रामपंचायत अंतर्गत चापट्टीपाडा, मनिबेली गावादरम्यान दरड कोसळल्याने अनेक दिवसापासून रस्ता बंद आहे. परंतु, प्रशासनाने अद्याप तो रास्ता दुरुस्त केला नाही. सरपंच दिलवरसिंग पाडवी यांनी रस्त्यावरील दरड हटवून, रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे अशी मागणी केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरात बानगे गावात दुर्मिळ प्रकार, म्हशीला जन्मलं दोन तोंडांचं रेडकू

मोठी बातमी! महाराष्ट्र सदन प्रकरण; बांधकाम करणारे चमणकर बंधू दोषमुक्त

Beed News: उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये दाखल; कारण काय? VIDEO

Express Way: राज्यात तयार होणार आणखी एक एक्स्प्रेस वे, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; ९३१ कोटी रूपये मंजूर

Ladki Bahin Yojana: दीड लाख लाडक्या बहीण अपात्र, हफ्ता थांबला, चौकशीसाठी गर्दी

SCROLL FOR NEXT