Accident News X
महाराष्ट्र

Accident News : वाहनाचा दोर तुटला अन् अनर्थ घडला; डीजे जनरेटरची दुचाकीला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

Nanded Accident News : डीजेच्या वाहनाच्या पाठीमागे जनरेटर बांधण्यासाठी वापरण्यात आलेली दोरी तुटली. जनरेटर दुचाकीला जाऊन धडकला. या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही, प्रतिनिधी

नांदेडमध्ये एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. डीजेच्या वाहनाच्या पाठीमागे बांधलेल्या जनरेटरचा दोर तुटल्याने मोठा अपघात झाला. जनरेटर दुचाकीला धडकल्याने एकजण जागीच ठार झाला, तर एकाला गंभीर दुखपात झाली. हिमायतनगर ते किनवट या राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डीजेचा जनरेटर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेला जात होता. वाहनाच्या पाठीमागे दोरीने जनरेटर मशीन बांधण्यात आली होती. दोरी तुटल्याने जनरेटर बाजूने जाणाऱ्या दुचाकीला जाऊन धडकला. जनरेटर अचानक धडकल्याने दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याला गंभीर जखमा झाल्या आहेत.

योगेश राठोड आणि गोरू राठोड हे दोघेजण हिमायतनगर येथून ईस्लापूरकडे दुचाकीने जात होते. डीजे जनरेटरची मशीन घेऊन जाणाऱ्या वाहनाची दोरी तुटली आणि जनरेटर दुचाकीला जोरात धडकला. या अपघातामध्ये योगेश राठोड हा तरुण जागीच ठार झाला. गोरू राठोड हा अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर हिमायतनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

डीजेच्या वाहनाच्या पाठीमागे जनरेटर मशीन दोरीने बांधली होती. हिमायतनगर ते किनवट या राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत असताना ही दोरी तुटली. त्यामुळे जनरेटर बाजूने जाणाऱ्या दुचाकीला जाऊन आदळला. ही दुर्दैवी घटना अनावधानाने घडली की निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला याचा तपास सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Ladki Bahin Yojana : महत्त्वाची बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारने पुन्हा घेतला मोठा निर्णय

Three Language Policy : मोठी बातमी! अखेर त्रिभाषा धोरणासाठी समिती स्थापन, ७ जणांचा समावेश

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT