Vijay Wadettiwar On Reservation Politics Saam TV
महाराष्ट्र

Reservation Politics: मराठा आणि OBC समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे, वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल

साम टिव्ही ब्युरो

Vijay Wadettiwar On Reservation Politics:

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, परंतु इतरांच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये,अशी आमची भूमिका आहे. सरकार म्हणून मराठा, ओबीसी आरक्षणाबाबतची भूमिका सरकार जाहीर करत नाही. मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण करून राज्याला उद्ध्वस्त करण्याचे काम सध्या सुरू आहे, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

आज विधानभवन येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत वडेट्टीवार असं म्हणाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सरकारमधल्या मंत्र्यांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे सरकारची दुटप्पीपणाची भूमिका आता जनतेसमोर आली आहे. अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारचे वाभाडे काढले आहेत. त्याचबरोबर आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारमध्ये दम असेल तर जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.  (Latest Marathi News)

न्या.शिंदे समितीने श्वेत पत्रिका जाहीर करावी

वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्रातील कुणबी जातीची नोंद शोधण्याचे काम शिंदे समिती करत आहे. हे काम करत असताना इतर मागासवर्ग संवर्गातील समाविष्ठ सर्व जातीची नोंद शोधून त्याची श्वेतपत्रिका प्रकाशित करण्यात यावी. याबाबत सरकारने न्या. शिंदे समितीला निर्देश द्यावेत, अशी आग्रही भूमीका वडेट्टीवार यांनी मांडली आहे.

ओबीसी समाजाला सन १९६७च्या पूर्वीच्या पुराव्यांची नोंद शोधताना खूप मानसिक व आर्थिक त्रास होतो. त्यामुळे इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या लाभांपासून अनेकांना वंचित रहावे लागते. त्यामुळे शिंदे समितीने कुणबी जातीची नोंद शोधत असताना संबंधित कागदपत्रावर इतर मागासवर्गातील समाविष्ठ ज्या जातीचा उल्लेख असेल त्या जातींची सुद्धा नोंद घ्यावी. समितीने शोधलेल्या इतर मागासवर्गीय नोंदींची एक संयुक्त श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

SCROLL FOR NEXT