chandrapur : हरवलेल्या कुत्राला शोधून देणाऱ्यासाठी तब्बल इतके रुपये बक्षीस! चंद्रपूरात चर्चा  Saam Tv
महाराष्ट्र

हरवलेल्या कुत्राला शोधून देणाऱ्यासाठी तब्बल इतके रुपये बक्षीस! चंद्रपूरात चर्चा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चंद्रपूर : आपल्या घरात एखादा सदस्य हरवला किंवा घर सोडून गेला तर त्याकरिता आपल्या घरातील व्यक्तीचा जीव कासावीस होऊन त्याचा शोध घेऊ लागतात. नाही मिळाला तर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देऊन वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देखील देतात. त्यातही समाधान झाले नाही तर त्या व्यक्तीला शोधून देणाऱ्या व्यक्तीसाठी बक्षिस जाहीर करत असतात. अशीच एक बाब सामान्य आणि अपेक्षित आहे. मात्र, हे सगळं एखादा पाळीव प्राण्यासाठी होत असेल तर? तर अशी घटना दुर्मिळ म्हणावी लागणार आहे. मात्र, अशीच एक घटना चंद्रपूर (Chandrapur) शहरात घडली असून याची चंद्रपूर (Chandrapur) शहरात चांगलीच चर्चा रंगत आहे. एका हरवलेल्या कुत्र्याला (dog) शोधून देण्यासाठी त्याच्या मालकाने थेट बक्षीस जाहीर केले आहे. तेही १- २ हजार नाही तर तब्बल ५० हजार रुपये ठेवले आहे. 'जोरू' असे या कुत्र्याचे नाव असून डॉ. दिलीप कांबळे असे त्याच्या मालकाचे नाव आहे. डॉ. दिलीप कांबळे हे मूळचे नागपुरचे (Nagpur) असून त्यांचे रामाळा तलाव मार्गावर सिटी स्कॅन, एमआरआय सेंटर आहे. (reward finding a lost dog appeal of chandrapur dog lover)

हे देखील पहा-

तिथेच त्यांचे निवासस्थान देखील आहे. त्यांच्या बरोबर त्यांचा जोरू नावाचा कुत्रा होता. अगदी एक महिन्याचा असताना त्याला डॉ. कांबळे यांनी विकत घेतले होते. लाब्राडोर क्रॉस जातीचा असलेल्या या कुत्र्याचा सांभाळ कांबळे कुटुंबीयांनी अतिशय प्रेमाने करत असत. तेव्हापासूनचा तो घरचा एक सदस्य झाला होता. त्याला काय हवं, काय नको याची काळजी कांबळे कुटुंब घेत होते. २४ फेब्रुवारीच्या सकाळी जोरुला कांबळे कुटुंबीयांनी (family) फिरण्यासाठी बाहेर सोडले होते. घराच्या आजूबाजूला फिरल्यावर एक- दीड तास झाला की तो परत आपल्या घरी येत असायचा. मात्र, त्यादिवशी जोरू परत आला नाही. डॉ. कांबळे यांनी त्याची खूप शोधाशोध केली. मात्र, त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. जोरू हा अतिशय मनमिळावू असल्याने तो कुणाकडेही सहज जायचा. याचाच गैरफायदा कोणीतरी घेतला असावा आणि त्याला चोरून नेले असावे असा संशय डॉ. कांबळे यांना आहे. जोरू गायब झाल्यामुळे त्याला शोधण्यासाठी डॉ. कांबळे यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. आजूबाजूचा परिसर देखील पिंजून काढला आहे. मात्र, तो मिळाला नाही.

महापालिकेच्या डॉग स्नॅचर पथकाने तर हा कुत्रा नेला नसावा याची देखील शहानिशा केली. यामुळे जोरुचा फोटो टाकून त्याची माहिती देणाऱ्यास तब्बल ५० हजारांचे बक्षीस जाहीर करून सोशल मीडियावर ही पोस्ट टाकली होती. मात्र, तरीही त्याची माहिती मिळाली नाही. आता जोरुचे पॉम्प्लेट छापून ते शहरभर अनेक ठिकाणी चिटकविण्यात आले आहेत. तसेच स्थानिक वर्तमानपत्रात देखील त्यांनी याची जाहिरात दिली आहे. एवढेच नव्हे तर एखाद्या चोरट्याने या कुत्र्याला कुणाला विकले असेल तर ज्याने त्याला ज्या किंमतीत विकत घेतले आहे. त्यापेक्षा ३ पटीने पैसे देण्याची तयारी डॉ. कांबळे यांनी दर्शवली आहे. डॉ. कांबळे यांची मुलगी काशी हिला जोरुचा फार लळा लागला होता. ८ वर्षीय कांशी त्याच्याशिवाय राहू शकत नव्हती. दिवसरात्र ती त्याच्या बरोबर खेळत असायची. मात्र, जोरू गायब झाल्यामुळे तिला कमालीचे दुःख झाले आहे. जोरूला परत आणा नाहीतर मी जेवणार नाही असा तगादा तिने लावला आहे. तब्बल ७ दिवस ती काही खायला प्यायला तयार नव्हती. तिची समजूत काढली, तरी ती मानायला तयार नव्हती. दररोज ती जोरूचाच तगादा लावत आहे, असे डॉ. कांबळे सांगत आहेत. आमच्या घरात एक सदस्य हरवला आहे, असेच आम्हाला वाटत आहे असे कांबळे यावेळी म्हणत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra News Live Updates: देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार - मोदी

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, १० टक्के मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार?

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT