माळीण तळियेची पुनरावृत्ती 'येथे' घडण्याची शक्यता Saam Tv
महाराष्ट्र

माळीण तळियेची पुनरावृत्ती 'येथे' घडण्याची शक्यता

जीव मुठीत घेऊन ग्रामस्थ आपला एक एक दिवस काढत आहे

अभिजीत सोनावणे

नाशिक - त्र्यंबकेश्वरच्या Trimbakeshwar ब्रह्मगिरी पर्वताच्या डोंगर कड्यावर राहणाऱ्या सुपल्याची मेट गावातल्या ग्रामस्थांना गेल्या काही दिवसांपासून आपला जीव मुठीत घेऊन राहण्याची वेळ आली आहे. उत्खननामुळे पोखरण्यात येत असलेल्या ब्रम्हगिरी Brahmpuri मुळे जमीन धसण्याची आणि कड्यावरून कधीही दरड कोसळल्याची भीती या दहशतीत सध्या ग्रामस्थ आपला एक एक दिवस काढत आहे.

सह्याद्रीच्या उंचच उंच कड्यावर वसलेले सुपल्याची मेट हे गाव आहे. गावाची लोकसंख्या तीनशे ते साडे तीनशेच्या घरात असून इथले ग्रामस्थ गेल्या काही दिवसांपासून मोठ्या संकटात सापडले आहे. गावकऱ्यांना दररोज आपला दिवस आणि रात्र अक्षरशः जीव मुठीत धरून आपल्या मुलाबाळांसह गावात रहावं लागत आहे.

हे देखील पहा -

उद्याचा दिवस पाहायला मिळेल की नाही? याचीही शाश्वती नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून गावाच्या खालील बाजूला सुरू असलेले ब्रह्मगिरी पर्वताचे उत्खनन. सपाटीकरण आणि उत्खननासाठी करण्यात येत असलेले भुसुरुंगाचे स्फोट. भुसुरुंग स्फोटामुळे खाली धसणारी माती आणि त्यांच्या धक्क्याने वर ब्रम्हगिरीच्या ताशीव कड्याच्या सुटत चाललेल्या खडकाची आवरणामुळे दरड कोसळण्याची भीती, अशा धोक्याच्या उंबरठ्यावर हे गाव आहे.

गेल्या 15 ते 20 दिवसांत ब्रह्मगिरी डोंगराच्या दुसऱ्या बाजूला दोनदा दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. 2 दिवसांपूर्वी तर सुपलीची मेट शेजारील गंगाद्वारच्या परिसरात दरड कोसळल्याने 2 जण जखमी झाले. त्यामुळे गंगाद्वार मेटला राहणाऱ्या ग्रामस्थांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. दरड कधी कोसळेल याचा नेम नाही, हे सांगतांना गावातल्या महिलांच्या डोळ्यात दिसणारी भीती सर्वकाही सांगून जातेय. बरं ही परिस्थिती एकट्या सुपल्याची मेटची नाही आहे तर गंगाद्वार मेट आणि विनायक मेटमधल्या ग्रामस्थांचीही हीच परिस्थिती आहे.

गेल्या काही महिन्यांपासून विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या ब्रम्हगिरीच्या धोकादायक उत्खननाबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रार करूनही त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. आमचं माळीण अथवा तळये झाल्यावर प्रशासन आमच्याकडे लक्ष देणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

त्र्यंबकेश्वर किल्ल्याच्या संरक्षणासाठी ब्रह्मगिरी पर्वताच्या कडेवर सुपल्याची मेट सारखी अशी चार-पाच गावं आणि वाड्यावस्त्या काही शतकांपूर्वी वसवली गेली. किल्ल्यावर होणारे आक्रमण आधी या गावांनी झेलले, परकीय शत्रूंपासून किल्ल्याचे संरक्षण केले. मात्र कधीकाळी किल्ल्याच्या संरक्षणासाठी वसलेली गावे आता स्वतःचे संकटात सापडली आहे. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याआधी प्रशासनाने वेळीच सावध होऊन या ग्रामस्थांचे त्यांना हव्या त्या सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याची गरज आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Railway Accident : नाशिकमध्ये मोठी दुर्घटना, धावत्या एक्सप्रेसमधून ३ जण पडले, दोघांचा मृत्यू, एक गंभीर

Surya gochar: दिवाळीपूर्वी सूर्य-मंगळाने बनवला खास राजयोग; 'या' राशींच्या घरी येईल लक्ष्मी, घराची भरभराटही होईल

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Maharashtra Rain Alert : दिवाळीवर पावसाचे सावट, पुढील काही दिवस राज्यात कोसळधारा, 'या' जिल्ह्यांना IMD नं दिला इशारा

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

SCROLL FOR NEXT