किल्ले रायगडावर शिवसमाधीसमोर पुस्तक पूजनाचा प्रकार उजेडात; पुण्याचे दोघे ताब्यात Saam Tv
महाराष्ट्र

किल्ले रायगडावर शिवसमाधीसमोर पुस्तक पूजनाचा प्रकार उजेडात; पुण्याचे दोघे ताब्यात

किल्ले रायगडवर (Raigad Fort) धक्कादायक असा प्रकार घडला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : किल्ले रायगडवर (Raigad Fort) धक्कादायक असा प्रकार घडला आहे. शिवसमाधीसमोर राख आणून पुस्तक पूजन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. महाड (Mahad Police) तालुका पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी दुपारी शिवसमाधीसमोर पुस्तक पूजन सुरु असल्याचे गडावरील शिवप्रेमींना दिसून आले आहे.

हे देखील पहा-

यानंतर जेव्हा अधिक माहिती घेतली असता त्यांच्याकडे डब्यात राख असल्याचेही देखील दिसले आहे. त्यानंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त करत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी राख आणि पुस्तक जप्त केल्याचे समोर आले आहे. शिवसमाधीसमोर पुस्तक पुजनाच्या या प्रकारानंतर राख आणि पुस्तक पोलिसांनी जप्त केले आहे. (religious worship near samadhi of chhatrapati shivaji maharaj on raigad fort)

डब्यातील राखेची लॅबमध्ये चाचणी केली जाणार असल्याची माहिती समजत आहे. दरम्यान, दोघांची नावे समजू शकलेली नाहीत. तसेच नेमके पुस्तक कोणते आणि ते काय करत होते याची माहिती आणखी समोर आली नाही. या प्रकरणाची नोंद महाड तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली असुन सदर अहवालानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT