Relief for Tenants Saam
महाराष्ट्र

भाडेकरूंना दिलासा; भाड्याच्या सदनिकांवर अतिरिक्त सेवा शुल्क वसूल आकारण्यास बंदी

Relief for Tenants: अपार्टमेंटमधील भाड्याने दिलेल्या घरांवर १० टक्के अतिरिक्त सेवा शुल्क (देखभाल शुल्क) आकारणे बेकायदा आहे, असा महत्त्वाचा आदेश नुकताच सहकारी संस्थांच्या उपनिबंधकांनी दिला.

Bhagyashree Kamble

  • भाडेकरू आणि घरमालकांना मोठा दिलासा.

  • १० टक्के अतिरिक्त सेवा शुल्क आकारणं बेकायदा.

  • मात्र, सोसायटीत शुल्क आकारता येणार.

अपार्टमेंटमधील भाडेतत्त्वावर दिलेल्या सदनिकांवर १० टक्के अतिरिक्त सेवा शुल्क (देखभाल शुल्क) आकारणे बेकायदा असल्याचा महत्वपूर्ण आदेश नुकताच सहकारी संस्थांच्या उपनिबंधकांनी दिला. या निर्णयामुळे भाड्यानं घर देणाऱ्या मालकांना आणि भाडेकरूंना मोठा दिलासा मिळणार आहे.

काही अपार्टमेंट व्यवस्थापन समित्या किंवा व्यवस्थापक भाड्यानं दिलेल्या सदनिकांवर नियमित देखभाल शुल्काबरोबरच १० टक्के नॉन- ऑक्युपन्सी शुल्क आकारत होते. या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या तक्रारीवर सुनावणी घेत उपनिबंधकांनी असा शुल्क आकारणे नियमबाह्य ठरवले आहे.

उपनिबंधक मिलिंद टांकसाळे यांनी दिलेल्या आदेशात म्हटलं की, अपार्टमेंटमधील सुविधा, सुरक्षा, साफसफाई यासाठी आकारले जाणारे देखभाल शुल्क सर्व सदस्यांकडून एकसारखेच असावे. भाड्यानं दिलेल्या सदनिकांसाठी वेगळे किंवा अतिरिक्त शुल्क आकारता येणार नाही. महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप कायदा १९७० आणि कंडोमिनियमचे नोंदणीकृत उपविधीमध्ये अशा कोणत्याही शुल्काची तरतूद नाही.

सोसायटीमध्ये मात्र परवानगी

सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मात्र, एनओसी शुल्क आकारण्याची तरतूद आहे. जर एखादा सभासद स्वतच्या: सदनिकेत राहत नसेल आणि ती भाड्यानं दिलेली असेल, तर एनओसी शुल्क आकारले जाऊ शकते. मात्र, हे शुल्क मूळ देखभाल शुल्काच्या १० टक्केहून अधिक नसावे, असा नियम आहे.

नॉन - ऑक्युपन्सी शुल्क म्हणजे काय?

एखाद्या सदस्यानं स्वत:न राहता घर भाड्यानं दिल्यास सोसायटीकडून आकारला जाणारा १० टक्के पर्यंतचा अतिरिक्त शुल्क म्हणजे नॉन ऑक्युपन्सी शुल्क.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT