Housing society notice board in Mumbai Sub-registrar’s decision brings relief to homeowners renting flats. Saam Tv
महाराष्ट्र

Homeowners: हाऊसिंग सोसायट्यांच्या मनमानीला आळा, घरमालकांना मिळाला मोठा दिलासा

Big Decision for Flat Owners: घरमालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. घरमालकांना घर भाड्यानं देताना होणारा ताप आता कमी होणार आहे?

Suprim Maskar

घरमालकांच्या डोक्याचा व्याप आता कमी होणार? कारण हाऊसिंग सोसायट्यांमध्ये भाड्याने दिल्या जाणाऱ्या घरांबाबत उपनिबंधकांनी महत्त्वाचा निर्णय दिलाय.. फ्लॅट भाड्याने दिल्यानंतर घरमालकाकडून नॉन-ऑक्युपन्सी शुल्काव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारता येणार नाही, असे निर्देश सहकारी संस्थांच्या उपनिबंधकांनी दिलेत.. नेमकं प्रकरण काय आहे

मुंबईच्या शीव, प्रतीक्षा नगर परिसरातील एका सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सभासदाकडून बिल्डिंग डेव्हलपमेंट फंडाच्या नावाखाली 5000 रुपये आकारले जात होते. हा निर्णय चुकीचा असल्याचे उपनिबंधकांनी सांगितले. आणि वादग्रस्त रक्कम दोन महिन्यांत तक्रारदाराच्या मासिक देखभाल बिलांमध्ये समाविष्ट करण्याचे आदेश दिले. तसेच नॉन-ऑक्युपन्सी शुल्क म्हणजे घर भाड्याने दिल्यावर आकारले जाणारे अतिरिक्त शुल्क 10% पेक्षा जास्त नसावे असेही निर्देश दिलेत.

या निर्णयामुळे हाऊसिंग सोसायट्यांच्या मनमानी कारभाराला चाप बसेल तसेच घरभाड्याने देणाऱ्या घरमालकांना अतिरिक्त शुल्काचा बोजाही झेलावा लागणार नाही..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Explainer : जगात सर्वाधिक गॅसचे उत्पादन कोणता देश करतो? कसा तयार केला जातो स्वयंपाकाचा गॅस?

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये झुरळं अन् ढेकणांचा सुळसुळाट, प्रवाशांची होतेय गैरसोय; VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जालन्यात प्रशासन ॲक्शन मोडवर

Pune Crime: रमजानच्या महिन्यात पुणे हादरलं! किरकोळ वादानंतर ६ जणांनी फैसलच्या छाती, पाठीत भोसकला चाकू, CCTV Video व्हायरल

Crime: पाणी वाया का घालवतो? जाब विचारल्याने तरुणाची सटकली; सुरक्षारक्षकाला जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT