Solapur Crime News Today 
महाराष्ट्र

सोलापूर हादरले! प्रपोज नाकारल्याचा राग, महिलेच्या लग्नानंतर अवघ्या २ महिन्यांत पतीचा खून, कोयत्याने सपासप वार

One-Sided Love Crime : सोलापुरात एकतर्फी प्रेमातून धक्कादायक हत्याकांड घडले आहे. प्रपोज नाकारल्याचा राग मनात धरून एका १९ वर्षीय तरुणाने महिलेच्या पतीवर कोयत्याने सपासप वार करून हत्या केल्याचा आरोप आहे.

विश्वभुषण लिमये

Solapur Crime News Today : एकतर्फी प्रेम करणाऱ्या एका तरुणाने प्रेयसीच्या पतीची धारदार कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील एका कंपनीसमोर रात्री सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली. सिद्धाराम कैलास कटप (वय २०, व्यवसाय- रिक्षाचालक) असे खून झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी १९ वर्षीय आरोपी संतोष महादेव पाटील याला तातडीने अटक केली आहे.

पुलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सिद्धाराम आणि आरोपी संतोष हे दोघेही एकाच परिसरात राहतात. याच परिसरातील एका तरुणीवर संतोषचे एकतर्फी प्रेम होते आणि त्याने तिला लग्नासाठी प्रपोजही केले होते. मात्र, त्या तरुणीने त्याचा प्रपोजल नाकारला होता. त्यानंतर २० एप्रिल रोजी त्या तरुणीचा विवाह सिद्धाराम कटप याच्याशी झाला.

या लग्नामुळे संतोषच्या मनात सिद्धारामबद्दल प्रचंड राग आणि आकस निर्माण झाला होता. याच रागातून संतोषने सिद्धारामला फोन करून अक्कलकोट रोडवर भेटण्यासाठी बोलावले. तिथे दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतोषने सोबत आणलेल्या धारदार कोयत्याने सिद्धारामवर थेट हल्ला चढवला आणि एकापाठोपाठ एक सपासप वार केले.

या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सिद्धारामचा जागीच मृत्यू झाला. या खळबळजनक हत्याकांडप्रकरणी सोलापूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा (Murder) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 तास ठाण्यातच ठेवले; 73 वर्षीय नागरिकाला ठाण्यातच ब्रेन स्ट्रोक, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार बीडमध्ये दाखल

Skin Care : शरीरावरील स्ट्रेच मार्क 'या' गंभीर आजाराचे असू शकतात संकेत, वेळीच घ्या जाणून

Nepal : ६ हून अधिक शहरांमध्ये कर्फ्यू; नेपाळमध्ये हिंसाचार उफाळला, दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना

LPG सिलेंडर ते रेल्वे तिकीट; १ ऑगस्टपासून देशभरात होतील ५ मोठे बदल

SCROLL FOR NEXT