Congress  Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra Politics: पुण्यात राजकीय भूकंपाचे संकेत, शिंदे कनेक्शन असलेल्या नेत्याचं व्हाट्सअप स्टेटस चर्चेत, काँग्रेसला भगदाड पडणार?

Political Defections in Maharashtra: काँग्रेसचा खास नेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटत असल्याची चर्चा. व्हाट्सअप स्टेटसमुळे चर्चेला उधाण. स्टेटस सोशल मीडियात व्हायरल.

Bhagyashree Kamble

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीत जोरदार इनकमिंग सुरू आहे. अशातच काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

विधानसभा निवडणुकीत पराभव स्विकारल्यानंतर काँग्रेस नेते रविंद्र धंगेकर पक्षापासून अलिप्तच असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, काही दिवसांपूर्वी धंगेकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते. विशेष म्हणजे त्यांनी ठेवलेल्या स्टेटसची जोरदार चर्चा आहे. त्यांनी स्टेटस ठेवून शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याचं संकेत दिलं आहे का? अशी चर्चा रंगली आहे.

राज्यामध्ये सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळी मैदानात उतरले आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. नेते मंडळी राज्य पिंजून काढत आहेत.

याच धर्तीवर शिंदेसेनेकडून मिशन पुणे राबविण्यात येणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये एक मोठा राजकीय प्रवेश पुण्यात होणार असल्याचा दावा शिंदेसेनेकडून करण्यात येत होता. हा प्रवेश रवींद्र धंगेकर यांचा असणार का? या बाबतच्या चर्चा सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धंगेकर यांची भेट घेतली होती. त्यानंतरच त्यांच्या शिंदेसेनेमध्ये प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाल्या. याच दरम्यान, त्यांनी ठेवलेल्या स्टेटसची चर्चा सुरू आहे. त्यांनी ठेवलेल्या स्टेटसमध्ये रविंद्र धंगेकर दिसत आहेत. त्यांनी गळ्यात भगवा रंगाचा गमछा परिधान केलेला आहे.

धंगेकर पक्षांतर करणार?

धंगेकर यांनी स्टेटसवर फोटो शेअर करत एक गाणं देखील जोडलं आहे. 'शाह का रूतबा' या गाण्यातील एक ओळ ठेवली आहे. त्यांनी ठेवलेल्या या स्टेटसमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. धंगेकर पक्षांतर करणार का? त्यांनी पक्षांतराचा विचार पक्का केलाय का? असे प्रश्न उपस्थित होत आहे.

रविंद्र धंगेकर यांना डावलल्याची कुजबूज

पुणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून ७ विधानसभा मतदारसंघात निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती. यात माजी आमदारांसह वरिष्ठ नेत्यांना जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, या नियुक्त्यांमध्ये रविंद्र धंगेकर यांना डावललं असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर त्यांनी स्वकीयांना डिवचणारं स्टटेस ठेवलं असल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

SCROLL FOR NEXT