Ravindra Chavan Launches Seva Sankalp Abhiyan In Dombivli On Pm Modi’s Birthday saam tv
महाराष्ट्र

मोदींच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत भाजपनं साधला डाव; विरोधकांना चीतपट देण्यासाठी चव्हाण मैदानात

BJP Chief Ravindra Chavan : महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम भाजपच्या देशव्यापी ‘सेवा संकल्प अभियाना’चा भाग आहे. यामागे आगामी राजकीय रणनीती आहे.

Bharat Jadhav

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत सेवा संकल्प अभियानाचा कार्यक्रम झाला.

  • देशभरातील सेवा संकल्प अभियान 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबरदरम्यान राबवले जात आहे.

  • डोंबिवलीतील कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेणारी बातमी डोंबिवलीतून समोर येतेय. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मोदींच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत डोंबिवलीत 'सेवा संकल्प अभियाना'चे रणशिंग फुंकले आहे. वरवर पाहता हा केवळ महाआरती आणि वाढदिवसाचा कार्यक्रम वाटत असला तरी, यामागे भाजपने आगामी राजकीय रणनीतीचा भाग आहे.

बाप्पाच्या दरबारातून थेट घरोघरी पोहोचण्याची रणनीती!

डोंबिवलीकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री गणेश मंदिर संस्थानात मंगळवारी भक्तीमय वातावरणात ग्रामदैवताची महाआरती संपन्न झाली खरी, पण त्यातून भाजपनं पक्षाची मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिममित्त देशभरात आशीर्वादाचा दिवा हे अभियान राबवण्यात आले.

डोंबिवलीमध्येही असाच उपक्रम राबवण्यात आला. मात्र त्याच्या मागून राजकीय रणनीती आखण्यात आलीय. या अभियानाच्या माध्यमातून थेट जनसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा आणि भाजपच्या विकसित भारत संकल्पाची घरोघरी चर्चा घडवून आणण्याचा हा भाजपचा प्रयत्न होता असं बोललं जातंय.

यावेळी बोलताना आमदार रविंद्र चव्हाण म्हणाले की, "हा आशीर्वादाचा दिवा मोदीजींच्या सेवाव्रताचे आणि विकसित भारताच्या संकल्पाचे प्रतीक आहे. आपणही आपल्या घरी किंवा परिसरात असाच दिवा प्रज्वलित करून आपल्या लाडक्या मोदीजींना शुभाशीर्वाद द्यावेत," असं आवाहन चव्हाणांनी केलं. यावेळी भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, कल्याण-डोंबिवलीचे उपमहापौर राहुल दामले, गटनेते शशिकांत कांबळे, पश्चिम मंडळ अध्यक्षा प्रिया जोशी, नगरसेवक मंदार हळबे, नगरसेवक समीर चिटणीस, नगरसेविका ज्योती पाटील, नगरसेविका मंदा पाटील, नगरसेविका रंजना पेणकर, नगरसेविका मृदुला नाख्ये, भाजपा युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष अनमोल म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पक्षफोडीसाठी भाजप-आयोगाची युती, बड्या नेत्याचा आरोप, तृणमूलचं चिन्ह गोठवलं, शिवसेनेचं काय होणार?

Political News: मोठी बातमी! काँग्रेसच्या बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

भाजपचे माजी आमदारावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; पीडितेच्या जीवाला धोका असल्याचा दावा

Kalya Miriche Fayade: काळी मिरीची चिमूटभर पूड 'या' ६ पदार्थांसोबत खा, चमत्कार पाहून व्हाल थक्क

Maharashtra News Live Update: साखर साठ्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, साखरेच्या किमती लवकरच कमी होणार

SCROLL FOR NEXT