Ravikant Tupkar Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : लाल्या सदृश्य रोगामुळे कपाशीचं मोठं नुकसान, नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई देण्याची रविकांत तुपकरांची मागणी

Buldhana Farmers News : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.

संजय जाधव, साम टीव्ही

Buldhana News : बुलढाण्यातील घाटाखालील भागात कपाशीवर मोठ्याप्रमाणात लाल्या सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकरी अक्षरश: कपाशीचे पीक उपटून फेकत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च आणि मेहनतीवर पाणी फेरले आहे.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सरकारकडून आधाराची गरज आहे. त्यामुळे लाल्या सदृश्य रोगामुळे कपाशीच्या झालेल्या नुकसानीची पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.

रविकांत तुपकर यांनी मुंबई मंत्रालयात भेट घेवून निवेदन दिले. त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा, मलकापूर, खामगाव, शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद या घाटाखालील तालुक्यांमधून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली आहे.

परंतु सध्या कपाशीवर लाल्या सदृश रोग पडल्याने कपाशीची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी कपाशीचे पिक जळाले आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत तर दुसरीकडे कृषी विभाग शेतकऱ्यांनाच दोष देऊन मोकळा झाला आहे. मोठा खर्च लावून आणि प्रचंड मेहनतीने शेतकऱ्यांनी लागवड केली परंतु लाल्या रेागामुळे त्यांच्या मेहनतीवर आणि खर्चावर पाणी फेरले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सरकारकडून आधाराची गरज आहे. (Maharashtra News)

त्यामुळे लाल्या रोगामुळे कपाशीच्या झालेल्या नुकसानीची पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे. यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन अजितदादा पवार व धनंजय मुंडे यांनी तुपकरांना दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Tourism: रत्नागिरीपासून अवघ्या पाऊण तासाच्या अंतरावर वसलंय स्वर्गाहून सुंदर ठिकाण; निळाशार समुद्र, सोनेरी वाळू अन् लपलेलं पर्यटन रत्न

Raj Thackeray: उद्धव ठाकरेंपाठोपाठ राज ठाकरे जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर, कसा असेल दौरा? VIDEO

MNS : प्ले ग्रुपमधील चिमुरड्याला मारहाण प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

शरीरावर असलेल्या बर्थमार्कमुळे कॅन्सर होऊ शकतो का?

Electric Shock : नव्या घरात जाण्याचे स्वप्न अपूर्ण; बांधकामाच्या ठिकाणी विजेचा धक्का लागून मृत्यू

SCROLL FOR NEXT