Ravikant Tupkar saam tv
महाराष्ट्र

Maratha Reservation : सरकारला इशारा... 'जो माणूस मरायला तयार होतो तो मारायला सुद्धा तयार होतो' (व्हिडिओ पाहा)

जो माणूस मरायला तयार होतो तो मारायला सुद्धा तयार होतो असं का म्हणाले रविकांत तुपकर (व्हिडिओ पाहा)

Siddharth Latkar

- चेतन व्यास

Wardha Crime News : मराठा समाजला आरक्षण देण्यात यावं याकरिता मनाेज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला सुरवात केली आहे. जरांगे पाटलांच आंदोलन व्यापक आहे. सरकारने त्यांना जी आश्वासन दिली आहेत ती पूर्ण केली पाहिजे या मताचे आम्ही आहोत असे मत शेतकरी नेते रवीकांत तुपकर यांनी व्यक्त केले. (Maharashtra News)

वर्धा येथे आयाेजिलेल्या पत्रकार परिषदेत तुपकर म्हणाले माझ्या पत्नीने जरांगे पाटलांची भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. मराठा समाज हा बहुतांश शेतकरी समाज आहे. त्याच्यावर ही गरिबीची वेळ का आली कारण शेतीच शोषण झालं आणि शेतीच्या शोषणातून ही गरिबी आली.

त्यामुळं मराठा समाजावर ही अवस्था आलेली आहे. मराठा समाजाचं म्हणणं आणि आम्ही जे म्हणतो ते एकच आहे. आम्ही जे म्हणतो आहे की आर्थिक स्तर मराठ्यांच उंचावलं पाहिजे, आर्थिक स्तर शेतकऱ्यांच उंचावलं पाहिजे. जे शेती करतो, शेतमजुरी करतो त्यांचं आर्थिक स्तर उंचावलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सरकारने जर शेतकऱ्यांकडं दुर्लक्ष केले तर मरता वो क्या नहीं करता. जो माणूस मारायला तयार होतो तो माणूस मारायला सुद्धा तयार होतो हे सरकारने सुद्धा ध्यानात ठेवावं असेही शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी नमूद केले.

दरम्यान सरकारची उस दर नियंत्रण समिती आहे. त्याची वर्षाला चार ते पाच बैठका होतात. पण सोयाबीन,कापूस, धान आणि संत्र्याच्या दराबाबत कोणतीही समिती नाहीय. सरकारने सोयाबीन,कापूस, धान आणि संत्र्याच्या दराबाबत एक समिती तयार केली पाहिजे आणि किमान दोन तरी बैठका या पिकांच्या दराबाबत घेत त्याच धोरण आखले पाहिजे अशी मागणीही तुपकर यांनी सरकारकडे केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT