Ravikant Tupkar
Ravikant Tupkar Saam Tv
महाराष्ट्र

Ravikant Tupkar: शेतकऱ्यांना पिकविमा नाकारल्याच्या निषेधार्थ रविकांत तुपकरांचे मुंडन आंदोलन

संजय जाधव, साम टीव्ही

बुलडाणा : रिलायन्स कृषी विमा कंपनीने बुलडाणा जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना पात्र असूनही पिकविमा दिला नाही. त्यामुळे संतप्त झालेले स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकरांनी स्वतः मुंडन करून प्रशासनाचा आणि विमा कंपनीचा निषेध केला आहे. यावेळी तुपकरांसह अनेक कार्यकर्त्यांनी मुंडन करुन पिकविमा कंपनी विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे (Ravikant Tupkar Mundan agitation to protest against denial of crop insurance to farmers).

चिखली कृषी कार्यालयासमोर 5 दिवसांपासून शेतकरी कडाक्याच्या थंडीत पिकविम्याच्या रकमेसाठी ठिय्या आंदोलन करीत आहे. प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे तुपकरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता आमचे केस कापले आंदोलनावर तोडगा निघाला नाही, तर रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या डोक्याचे केस उपटून काढू, असा इशारा रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी कार्यालय उद्ध्वस्त करण्याची धमकी दिल्याने आणि तुपकरांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने चिखली कृषी कार्यालयाबाहेर तणावाची परिस्थिती तयार झाली होती. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. जिल्ह्याचे कृषी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी आंदोलन स्थळी चर्चेसाठी दाखल.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fungal Infection: वेळीच व्हा सावधान 'या' कारणामुळे होऊ शकतो फंगल इन्फेक्शनचा भयंकर त्रास

Benifits of Chia Seeds: चिया सिड्सचे सेवन महिलांसाठी ठरते अत्यंत फायदेशीर

Dombivali Crime News : पती- पत्नीच्या भांडणात गमावला जीव; डोंबिवलीत दोन वेगवेगळ्या घटनामध्ये दोघांची हत्या

Today's Marathi News Live : माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण माघार घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल

Delhi News: कुजलेला तांदूळ, लाकडी भुसा अन् ॲसिडचा वापर.. दिल्लीत १५ टन बनावट मसाले जप्त; ३ अटकेत

SCROLL FOR NEXT