ravi rana and Bacchu Kadu saam tv
महाराष्ट्र

Bacchu Kadu VS Ravi Rana : बच्चू कडू यांच्या भाषणानंतर रवी राणा यांची पहिली प्रतिक्रिया

आमच्यातला वाद मिटला आहे. असे विषय संपवून पुढे जायला हवं, असं रवी राणा यांनी म्हटलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आदेशानुसार मी माझी भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. बच्चू कडू  (Bachhu Kadu) यांनी माझे आभारही मानले आहेत. त्यामुळे हा विषय इथे संपला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा (Ravin Rana) यांनी दिली आहे.

आमच्यातला वाद मिटला आहे. असे विषय संपवून पुढे जायला हवं. लोकशाहीत असं घडत असतं. शेतकऱ्यांचे, बेरोजगारांच्या, सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आता काम करायचं आहे. हा वाद आता संपला आहे, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.  (Latest News)

आगामी निवडणुकीत विरोधात उमेदवार उभे केले जाणार आहेत यावर बोलतांना रवी राणा यांनी म्हटलं की, माझ्या विरोधात 50 उमेदवार उभे राहतात. किती जरी उमेदवार उभे राहिले तरी जनता ज्यांच्या सोबत असते, ज्यांच्यावर आशीर्वाद असतात तेच जिंकून येतात. मी मागच्या वेळी 20 ते 22 हजार मतांनी विजयी झालो होतो, याची आठवणही त्यांनी करुन दिली.

मी सर्वसामान्यांना मदत करतो, अपंगाना मदत करतो, माजी सैनिकांना मदत करतो. माझा पगार देखील माजी सैनिकांसाठी घर बांधून देण्यासाठी खर्च करतो. गोरगरिबांना न्याय देण्यासाठी मी काम करतो. म्हणून जनता माझ्यासोबत आहे, असंही रवी राणा यांनी म्हटलं.

बच्चू कडू यांनी काय म्हटलं?

रवी राणा यांनी माघार घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी देखील अमरावतीमध्ये प्रसारमाध्यमांसमोर वादावर पडता टाकला. मी आमदार रवी राणा यांना माफ केलं. हा विषय संपला आहे. माझ्याकडूनही चुकून काही चुकीचे शब्द निघाले असतील, तर तेही शब्द मागे घेतो, असं बच्चू कडू यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

चॉकलेटचं आमिष दाखवत 3 वर्षांच्या चिमुकलीला सोबत नेलं, २० मिनिटांनी घरी आणून सोडलं... नराधमाचं संतापजनक कृत्य

जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवा वांग्याचे कुरकुरीत काप; सोपी आणि चवदार रेसिपी!

SCROLL FOR NEXT