Maharashtra Mantralaya 
महाराष्ट्र

Special Report : मंत्रालय पोखरणाऱ्या उंदरांचा बंदोबस्त कधी?

Maharashtra Mantralaya : महाराष्ट्राच्या मंत्रालयात उंदीर आणि घुशींचा सुळसुळाट झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मंत्रालयातील स्वच्छता, सरकारी फाईल्सची सुरक्षितता आणि प्रशासकीय यंत्रणेच्या जबाबदारीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Rohit Kadam

राज्याचा कारभार जिथून चालतो त्याच ठिकाणी स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडालाय. मंत्रालयात चक्क उंदरांचा सुळसुळाट पाहायाला मिळतोय... त्यामुळे मंत्रालयातील महत्त्वाच्या फाईल्स खरचं सुरक्षित आहेत का? मंत्रालय पोखरणाऱ्या उंदाराचा बंदोबस्त प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी कधी करणार? पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट...

ही हाय मंत्रालय... इथं राज्याचं कारभारी भसत्यात.. अन् राज्याचा गाडा हाकत्यात.. ती बी एकदम जोमात... पण आता याच मंत्रालयाचा ताबा घेतलाय उंदरांनी अन् घुशींनी अन् ह्यो त्याचा पुरावा...

या खुर्चीवरनं त्या खुर्चीव अन् ह्या कपाटावरनं त्या कपाटावर टाना उटन उड्या मारणात बिंधास्त चाललाय उंदराचा कारभार... ना कोई डर ना किसी का टेन्शन... प्रशासकीय अन् राजकीय कारभाराला भ्रष्टाचारानी पोखरल्याची लय उदाहरणं... त्यात मंत्रालयात उंदराची एंट्री....

मंत्रालय म्हणजी एकदम इंपोर्टंन्ट जागा.. एकदम सेनसिटीव्ह ठिकाणंचा ताबा उंदारांनी घेणं म्हणजी सुरक्षेचा मुद्दा पॉईंटवर हाय. जर का उंदरांनी वायर खाल्ली अन् भलतच घडलं तर जबाबदार कोण?

अधिच भ्रष्टाचाराची किड लागलेल्या प्रशासकीय आणि राजकीय विभागत एखादी फाईल उंदरानं पोखरली अन् एखादा भ्रष्ट अधिकारी अन् नेता मोकाट सुटला तर अश्चर्य वाटायला नको

मुंबईतनं गिरीश कांबळे, साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gokul Election: गोकूळ जिंकलं, अध्यक्षपदाचं काय? सतेज पाटील कसं जुळवणार सत्तेचं गणित?

Methichya Bhajiche Fayde: कडू पण आरोग्यासाठी फायदेशीर! मेथीची भाजी खाण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे

'मुंबईने भरभरून दिले, आता परतफेड करा, हायकोर्टानं बॉलिवूड सेलिब्रेटींना फटकारलं

Maharashtra Vidhan Parishad Election Result Live: छत्रपती संभाजीनगर: आतापर्यंत उमेदवारांना मिळालेली मते

शिक्षक-पदवीधरमध्ये मोठा उलटफेर! पुण्यात भाजपच्या स्मिता जाधव पिछाडीवर, ५ जागांवर कोण पुढे, कोण मागे? धक्कादायक कल समोर

SCROLL FOR NEXT